Home Breaking News *म्हसवडमध्ये नगरपालिकेच्या सगळ्या प्रभागात बोगस मतदारांचा सुळसुळाट-अभयसिंह जगताप यांचा पत्रकार परिषदेत आरोप

*म्हसवडमध्ये नगरपालिकेच्या सगळ्या प्रभागात बोगस मतदारांचा सुळसुळाट-अभयसिंह जगताप यांचा पत्रकार परिषदेत आरोप

258

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.19ऑक्टोबर):-आगामी होवु घातलेल्या म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी गटाने प्रशासनाला हाताशी धरुन बोगस मतदारांची मोठी संख्या मतदार यादीमध्ये वाढवलेली आहे, गतवेळी झालेल्या पालिका निवडणुकीत हेच बोगस मतदार अनेकांसाठी आधार ठरले होते, अशा बोगस मतदारांविरोधात आपण निवडणुक आयोगाकडे हरकती दाखल केल्या आहेत, ही बोगस नावे मतदार यादीतुन वगळावीत यासाठी आमचा लढा सुरु असुन वेळप्रसंगी आपण उच्च न्यायालयात याविरोधात दाद मागणार असल्याचे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस व युवा नेते अभयसिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेद्वारे मांडले.

म्हसवड पालिका निवडणुकीच्या अनुषंघाने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर आक्षेप घेतलेल्या जगताप यांनी प्रशासन व सत्ताधारी गटावर जोरदार पत्रकार परिषदेद्वारे जोरदार हल्ला केला. जगताप यांनी याविरोधात आवाज उठवताना पालिका हद्दीतील सर्व १० प्रभागातील मतदार याद्या पत्रकारांसमोर सादर करताना एकाच मतदारांची दोन प्रभागात नावे आल्याचे स्पष्ट केले, तर काही प्रभागात सत्ताधार्यांनी आपल्या विरोधातील मतदारांची नावे जाणीवपुर्वक त्या प्रभागातुन वगळली आहेत, तर आपल्या मर्जीतील इतर प्रभागातील नावे आपल्या प्रभागात लावली आहेत. एवढेच काय तर एका महाभागाने प्रशासनाला हाताशी धरुन ग्रामीण भागातील जनतेची नावेही आपल्या प्रभागात लावली आहेत, ती नावे आम्ही शोधुन काढली असुन यावर हरकत घेताना संबधित ग्रामीण भागातील जनतेचे आधारकार्ड आम्ही सोबत जोडले आहे. ज्यांना स्वतःच्या प्रभागात पडण्याची भिती वाटते अशांनीच हे उद्योग केले असले तरी त्यांची डाळ आता शिजणार नाही.

म्हसवड पालिकेच्या मतदार यादीमध्ये ४६० असे मतदार आहेत की ज्यांची नावे विविध प्रभागात लावण्यात आलेली असुन ही नावे काही प्रभागात दोन वेळा आहेत तर काही प्रभागात ३ वेळा लावली गेली असुन ती ओळखु येवु नयेत यासाठी त्यांच्या फोटोत छेडछाड केली आहे. अशी संख्या मोठी असल्याने ४६० मतदार असे आहेत की त्यावर हरकत न घेतल्यास ९४३ वेळा ते मतदान करु शकतात. हा आकडा फार गंभीर असा असुन यामुळे निकाल कधीही बदलु शकतो. गतवेळी झालेल्या पालिका निवडणुकीत १ मताने व ६ मताने काही मतदार विजयी झाले आहेत हा अशा बोगस मतांचाच तो परिणाम होता, आता मात्र आम्ही शांत बसणार नसुन याविरोधात आमचा लढा सुरुच ठेवणार आहोत, जोवर मतदार यादीतील बोगस मतदार वगळले जात नाहीत तोवर पालिका निवडणुक आयोगानेही घेवु नयेत आम्हाला जर अपेक्षित न्याय न मिळाल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे यावेळी जगताप यांनी स्पष्ट केले.

दरम्यान यावेळी प्रभाग क्र. २ मध्ये राहणारे आनंदा मासाळ यांनी सांगितले की आगामी होवु घातलेल्या पालिका निवडणुकीत मी शरदचंद्र पवार गटाकडुन इच्छुक आहे मी प्रभाग क्र. २ मध्ये राहतो याठिकाणी मी माझ्या पत्नी ला पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे, मात्र या प्रभागात माझ्याच पत्नीचे नाव वगळले असुन ते इतर प्रभागात दिसत आहे. याविरोधात आपण दोन हरकती नोंदवल्या आहेत.

बोगस मतदारांविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडुन आतापर्यंत ९४३ हरकती नोंदवण्यात आल्या असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी पिंटुशेठ लिंगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here