Home अमरावती दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्या मुंबई -शाखा अमरावती तर्फे सामाजिक दिवाळी...

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्या मुंबई -शाखा अमरावती तर्फे सामाजिक दिवाळी संपन्न

163

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.19ऑक्टोबर):- दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्या.मुंबई,शाखा टोपे नगर,अमरावती तर्फे दिवाळी पूजन करण्यात आले. त्या निमित्ताने सौ.निकिता हुणक्या पवार निर्मित निराधार फासेपारधी विकास संस्था, गुरुकुल प्रकल्प, राजुरा या संस्थेच्या फासेपारधी समाजाच्या मुला-मुलींना कपडे, टाॅवेल, मॅजीक बुक, पुस्तके व दिवाळी फराळ देण्यात आला.

     प्रमुख अतिथी अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी “शुभ दिपावली” या स्वरचित लोकगीताचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले व दिवाळी २०२५ च्या वऱ्हाडी काव्यातून सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि फासेपारधी विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे पदार्थ व ग्रंथ भेट देऊन दिवाळी साजरी केली.

                   व्यवस्थापक श्री किशोर राऊत यांनी सर्वांना बँकेतर्फे दीपावली २०२५ च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व बँकेतर्फे केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

          संस्थेच्या संस्थापक सौ. निकिता पवार यांनी आपल्या मनोगतून संस्थेविषयी माहिती सांगून फासेपारधी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले .

             सामाजिक कार्यकर्त्या सौ.निकिता हुणक्या पवार यांनी पुण्यातील चांगल्या पगाराची नौकरी सोडून निराधार फासेपारधी विकास संस्थेची स्थापना २०१७ साली राजुरा, कुऱ्हा रोड, अमरावती येथे करून त्याअंतर्गत मैत्रयी आदिवासी आश्रम सुरू केला. ही संस्था फासेपारधी विद्यार्थ्यांच्या – समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक विकासाकरिता सतत कार्य करीत आहे. गेल्या आठ वर्षापासून सिग्नल वर भीक मागणाऱ्या फासेपारधी मुलांकरिता शाळा बाह्य मुलांची शाळा त्यांनी सुरू केली, तसेच गेल्या वर्षा पासून निराधार अनाथ व एकल माताचे पुनर्वसनाचे कार्य सुद्धा त्या करीत आहेत. या त्यांच्या शाळेत तीस मुलं व मुले निवासी आहेत. ह्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी संस्थेने घेतली आहे. लोकवर्गणीतून त्यांचे हे कार्य सुरू आहे.

            सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी ॲड.उदयरावजी देशमुख, उपाध्यक्ष विदर्भ युथ संस्था तथा उपाध्यक्ष प्रा.राम मेघे इंजिनिअरीग काॅलेज अमरावती, प्रा.प्रभाकरराव ठाकरे, अध्यक्ष कर्मयोगी गाडगेबाबा विचार मंच, अभिनंदन बँकेचे सी ई ओ श्री शिवाजीराव देठे, साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले सर, मुख्याध्यापक प्रा. बाबुरावजी शेळके ह. भ.प.इंजी.श्री आमलेजी, श्री सुरेशजी भुयार सर.प्रा किशोर देशमुख सर होते तसेच इतर प्रतिष्ठित नागरिक, खातेदार ,ग्राहक यांची या कार्यक्रमास उपस्थिती लाभली.

      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा व्यवस्थापक श्री किशोर राऊत, सौ रंजना निचळ द्वितीय श्रेणी अधिकारी,कर्मचारी कु.पल्लवी ठाकरे, कु.अनिता राऊत,अनिल चव्हाण, सुरक्षा रक्षक श्री मानकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमांची सांगता दिवाळीच्या अल्पोपहारने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here