Home महाराष्ट्र अमरजीत साळुंके यांची राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष पदी निवड

अमरजीत साळुंके यांची राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष पदी निवड

296

✒️नागेश खुपसे-पाटील(सोलापूर,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.9ऑक्टोबर):- करमाळा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी शिवरत्न चे शिलेदार म्हणजेच मोहिते-पाटील यांचे एकनिष्ठ सहकारी अमरजीत साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. 

अमरजीत पाटील यांचे मुळ गाव करमाळा तालुक्यातील सातोली असून त्यांचे चुलते पंचायत समीती सदस्य होते , पहिल्या पासून मोहिते-पाटील कुटूंबाशी एकनिष्ठ म्हणून या परिवाराची ओळख आहे.

 या पुर्वी काँग्रेस आय पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदावर देखील त्यांनी काम केले आहे. तसेच मोहिते-पाटील भाजपात असताना ते भाजप तालुकाध्यक्ष पदासाठी चर्चेत होते मात्र त्यांना सरचिटणीस पदावर समाधान मानावे लागले.  

   आज शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांच्या नव्याने निवडी करण्यात आल्या या मध्ये अमरजीत साळुंके यांची निवड करण्यात आल्याने समर्थकांनी जल्लोष केला . या तालुकाध्यक्ष पदांच्या निवडीवर खा धैर्यशील मोहिते-पाटील यांचे वर्चस्व दिसत असल्याने शरदचंद्र पवार साहेबांनी जिल्ह्याची सर्व जबाबदारी पुन्हा एकदा मोहिते-पाटील यांच्या खांद्यावर दिली असल्याचे चित्र दिसत आहे. अमरजीत यांच्या निवडी नंतर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार नारायण पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

अमरजीत साळुंके हे केम गटातुन इच्छुक असल्याचे देखील बोलले जात असताना त्यांची तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याने पक्ष त्यांना संधी देणार अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here