Home महाराष्ट्र भूसंपादन, पाटबंधारे व निम्न तेरणा विभागाचा चुकीचा कारभार-शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल किमतीला;...

भूसंपादन, पाटबंधारे व निम्न तेरणा विभागाचा चुकीचा कारभार-शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल किमतीला; माजी सरपंच गुणाबाई बाबुराव केंद्रे

145

 

लातूर – जिल्ह्यातील खुर्द एकुर्का ता.जळकोट येथील तिरु नदी वरील गट नं 143 व गट नं 11 मधील बंधारा (बॅरेज) प्रशासकीय अधिकारी, इंजिनियर, बिल्डर यांनी चुकीच्या पद्धतीने बांधणी केल्या मुळे पावसाचे पाणी शेतामध्ये घुसून झालेले प्रचंड आर्थिक नुकसान, बंधाऱ्याची उंची कमी असणे, बॅरेज च्या आजूबाजुची ( पिच्चिंग ) उंची, लांबी कमी असणे, बंधारा करताना फक्त रुंदीकरण व सपाटीकरण केले. महत्वाचे म्हणजे बॅरेजचे खोलीकरण केलेच नाही. नवीन बंधारा बांधल्यावर सुद्धा जुना बंधारा पाडला नाही, त्यावरील लोखंडी ग्रील काढल्या नाही त्यामुळे झाडे, झुडपे, शेतातील वाहून आलेले सर्व कडबा, चारा कचरा अडकून पडल्यामुळे पावसाचे पाणी तीव्र गतीने वाहून गेले नाही. शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आणि हजारो हेक्टर शेती कायमची, वर्षानुवर्षे पाण्या खाली गेली तसेच 2021-2022 या वर्षी बॅरेज/बंधाऱ्याच्या जागेसाठी अधिग्रहित करत असलेल्या, केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य तो आर्थिक मोबदला तात्काळ देण्यात यावा आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा तत्काळ करावा यासाठी लातूरजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, लातूर भुसंपादन कार्यकारी अधिकारी, उदगीर तहसीलदार, जळकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी सरपंच गुणाबाई बाबुराव केंद्रे, शीतल केंद्रे, कौशल्या केंद्रे, रूपाली केंद्रे, दिपाली केंद्रे, वैशाली केंद्रे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here