


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड(सातारा ): म्हसवड व परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटी पावसामुळे शहरात प्रचंड हाहाकार माजला. अवकाळी व मुसळधार पावसामुळे गोरगरिबांच्या , दलीत ,मागासवर्गीय यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. काही घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली असून त्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. आधीच दैनंदिन मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांवर आता उपासमारीची वेळ ओढवली असून राहण्यासाठी जागेची प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे. शासनाने अशा कुटुंबांना तातडीने मदत द्यावी व तसेच या कुटुंबांना घरे बांधून देण्याची सोय करण्यात यावी . अशी अशी मागणी अॅड. राजू भोसले यांनी प्रसिद्धीपत्रिकाद्वारे शासनाकडे केली आहे.
याबाबत बोलताना अॅड. राजू भोसले म्हणाले,
ढगफुटी पावसामुळे ओढे, नदी, नाले तुडुंब भरून वाहिले. गावात पाणी शिरल्याने अनेकांचे संसारपयोगी साहित्य वाहून गेले. चिखल व पाण्यामुळे रस्ते, गल्ली-बोळ पाण्याखाली गेले. गरीब मागासवर्गीय कुटुंबांची करुण कहाणी
या परिसरातील बहुतांश घरांची पडझड झालेले कुटुंबे गरीब, शेतमजूर, विटभट्टी मजूर, हमाल , कामगार व दलीत मागासवर्गीय समाजातील असल्याने त्यांच्याकडे पुन्हा संसार व घरे उभा करण्याची ताकद नाही. मुलाबाळांसह उघड्यावर रात्र काढावी लागते आहे. पुरेसं अन्नधान्य नसल्याने उपासमारीची वेळ आली असून लहान मुलांचे हाल अधिकच तीव्र झाले आहेत.
या बाबत शासनाने तात्काळ मदत करावी
या पार्श्वभूमीवर ॲड .राजू भोसले यांनी शासनाकडे तातडीने मदत पुरविण्याची मागणी केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “गोरगरिबांची , दलितांची घरे उद्ध्वस्त झाल्यामुळे ते उघड्यावर आले आहेत. शासनाने अशा कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व धान्यपुरवठा करावा. तसेच या कुटुंबांना घरे बांधून देण्याची तातडीने सोय तहसील कार्यालयाच्या व नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी, ही आमची गरीब कुटुंबाच्या वतीने मागणी आहे.”
शासनाने घरासाठी आर्थिक मदत तातडीने देण्या बरोबरच, पावसामुळे रस्ते व गटारे कोसळल्याने संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण होवू शकतो. त्यावरही प्रशासनाने लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.














