


अमरावती ( प्रातिनिधी )
विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था,येरला द्वारा संचालित जिजामाता माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,मोर्शी,जि. अमरावती येथे सोमवार दि.२२/०९/२०२५ ला प्रभात समयी शारदा मातेची स्थापना सौ.विमलताई विकासराव ठाकरे(उपाध्यक्षा,विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था,येरला)यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.याप्रसंगी श्री विकासराव ठाकरे (सचिव, विदर्भ समाज कल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था ,येरला मोर्शी),सौ. शुभाताई सुहासराव ठाकरे (सदस्या,विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय शिक्षण संस्था,येरला),सौ. प्रज्ज्वलाताई पाटील-मोहोड (मोर्शी),सौ.शुभांगीताई जयंतराव सराटकर (मोर्शी)यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालक मेळाव्यातून झाली पालक जागृती
मंगळवार दि. २३/०९/ २०२५ ” पालक मेळावा “उत्साहात संपन्न झाला या पालक मेळाव्याचे अध्यक्ष श्री. सुधीरकुमार वं. सवाई (मुख्याध्यापक/प्राचार्य) तर प्रमुख अतिथी श्री.अशोकराव वारंगे,श्री.लक्ष्मणराव भालेराव, श्री. सचिनराव टेकाडे, श्री.विरेंद्रराव कोराटे,श्री.
राजेशराव राऊत, श्री.राजेंद्रराव कळसकर,श्री श्रीकृष्णराव निकम,सौ. सनमताई वानखडे हे जागृत पालक होते.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी शारदा मातेच्या मूर्तीचे व राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अभिवादन केले.अध्यक्ष प्राचार्य सुधीरकुमार सवाई यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन करून पालकांना पाल्यांच्या बाबतीत जागृत करण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी अशोकराव वारंगे, श्री.लक्ष्मणराव भालेराव,श्री. सचिनराव टेकाडे श्री. विरेंद्रराव कोराटे,श्री. राजेशराव राऊत,श्री.राजेंद्रराव कळसकर
श्री श्रीकृष्णराव निकम,सौ. सनमताई वानखडे यांनी मनोगत व्यक्त केले.या पालक मेळाव्या मध्ये शिक्षक व पालक यांनी केलेल्या हितगुजामधून विद्यार्थी गुणवंत कसा होईल,याचा विचार करण्यात आला.पालक मेळाव्याबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले.
या पालक मेळाव्याचे प्रास्ताविक प्रा.कोटांगळे सर, संचालन कु.कानबाले मॅडम तर आभार प्रा.ढोकणे मॅडम व सौ.सिमा गाडगे मॅडम यांनी मानले.
डॉ.सौ.ऋतुजा सागर श्रीराव यांची
आरोग्य विषयक कार्यशाळा
बुधवार दि. २४/०९/२०२५ ला शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉ.सौ.ऋतुजा सागर श्रीराव यांनी आरोग्य विषयक कार्यशाळा घेऊन या कार्यशाळेत त्यांनी आहार कोणता घ्यावा? कसा घ्यावा? कधी घ्यावा?सात्विक आहाराचे महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली सांगितली.”
शुक्रवार दि. २६/०९/२०२५ शारदा मातेचे विसर्जन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
शारदोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्री शैलेश ठाकरे सर तथा कार्यक्रमाचे संयोजक कु.ज्योती पद्मने (बुंदेले), कु.शालिनी अजमिरे (शिरभाते), कु.उज्ज्वला ढोकणे,कु.सिमा गाडगे, कु.वैशाली कानबाले, कु.सुजाता इंगळे,कु.समीक्षा नाखले,कु.तेजस्विनी श्रीराव सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी जिजामाता माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मोर्शी,ता. मोर्शी जि.अमरावती यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.














