


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड:
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत येथील विरकरवाडी रसत्यानजिकच्या हरिओम मल्टीपर्पज हॉल येथे उद्या सकाळी दहा वाजता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थित शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती येथील अप्पर तहसिलदार मिना बाबर यांनी दिली.
या शिबिरास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह माण मधील महसुल अधिकारी व कर्मचारी म्हसवड पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून महसुल दाखले, (डोमिसाईल, जातींचे दाखले, उत्पन्न दाखले व इतर ), संजय गांधी योजना, रेशनकार्ड, फेरफार नोंदी, आरोग्य शिबीर, आयुष्य माण कार्ड, शेतकरी कार्ड काढणे, आधारकार्ड, कृषी योजना,पंचायत समिती योजना, म्हसवड पालिकेच्या विविध योजना व इतर शासकीय योजनांचा एकाच ठिकाणी गरजू नागरिकांना लाभ दिला जाणार आहे.
या शिबिरास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मिना बाबर यांनी केले आहे.














