


प्रतिनिधी- जगदीप वनशिव
पुणे- येथे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी ) मुंबई सांस्कृतिक विभाग पुणे महानगरपालिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिले लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले होते संमेलनाअध्यक्ष ज्येष्ठ लेखक संपतराव जाधव या भूषविले आमदार सुनील कांबळे सामाजिक राजकिय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
परिसंवाद शाहीरी जलसा गझल मुशायरा कवी संमेलन झाले
गझल मैफिलचे सूत्रसंचालन व अध्यक्ष बबन चखाले ( विस्तार अधिकारी भोर )रुपाली अवचरे कविता काळे विजय कुमार कांबळे यांनी गझला सादर केल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष संतोष कांबळे सूत्रसंचालक विनोद अष्टुळ, प्रवीण खोलंबे, राहुल भोसले, लक्ष्मी रेड्डी, , प्रा. बाबासाहेब जाधव, सनी डाडर, नंदकिशोर गावडे, रानकवी जगदीप वनशिव, यू. के.आहेर, सुवर्णा पवार चंद्रकांत जोगदंड आशुतोष देशमुख, जयश्री श्रीखंडे, राजेंद्र फंड, सुनील सकट, अण्णासाहेब कसबे, बाबासाहेब ढोबळे, ॲड. श्रीधर कसबेकर, संतोष खवळे, उत्तम साठे, सुनील भिसे, काशीनाथ आल्हाट यांनी अण्णाभाऊ साठे प्रेम सामाजिक आयुष्य तमाशा अशा विविध विषयांवर मार्मिक भाष्य करत रसिकांची मनी जिंकली सर्व कवी गझलकार कलावंत यांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले पुणे पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन संपन्न झाले













