Home महाराष्ट्र क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्काराने मठपती सन्मानित

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्काराने मठपती सन्मानित

158

*प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)*

गंगाखेड येथील श्री सरस्वती विद्यालयातील माध्यमिक शिक्षक शिवप्रसाद नारायणराव मठपती यांना 2024-25 वर्षाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला.मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,विधानसभेचे अध्यक्ष ना.राहुल नार्वेकर,शालेय शिक्षण मंत्री ना.दादा भुसे,शिक्षण राज्यमंत्री ना.डॉ.पंकज भोयर,शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल,शिक्षण आयुक्त सच्छिन्द्र प्रतापसिंग यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मठपती यांचे शैक्षणिक कार्य क्षितिज समांतर असून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी, तसेच श्री सरस्वती विद्यालय प्रशाला,गंगाखेड या तिन्ही शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी त्यांचे शैक्षणिक कार्य केले आहे.दीक्षा ॲपसाठी ई-साहित्य निर्मिती, कोविड काळात आठवी ते दहावी सामाजिक शास्त्र विषयासाठी सेतू अभ्यास निर्मिती, तसेच ‘शाळा बंद पण शिक्षण सुर’ या उपक्रमांतर्गत अभ्यासमाला निर्मिती, तालुका,जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध प्रशिक्षणामध्ये त्यांचा सहभाग त्याचबरोबर तज्ञ मार्गदर्शक म्हणून माध्यमिक उद्बोधन वर्ग, शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण, मूल्यवर्धन प्रशिक्षण असे अनेक प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केलेले आहे.
स्कर्ट पोर्टलवर/वेबसाईटवर अनेक शैक्षणिक साहित्य निर्मिती मध्ये सहभाग,नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने इतिहास विषयाच्या अभ्यास निर्मिती सदस्य म्हणून कार्य,तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती (बालभारती) येथे इयत्ता नववी दहावीसाठी सदस्य आहेत.शासनाच्या अनेक शैक्षणिक उपक्रमामध्ये नेहमीच मठपती यांचा सहभाग राहिलेला आहे यात आनंददायी शनिवार,उल्हास नवभारत साक्षरता अभियान,परीक्षपे चर्चा अशा अनेक शैक्षणिक उपक्रमात सतत सहभाग,शैक्षणिक कार्य बरोबर सामाजिक उपक्रमांमध्ये मोठा सहभाग आहे.यात स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती असेल अथवा अमली पदार्थ विरोधी जनजागृती,पर्यावरण व वृक्ष लागवड अशा अनेक सामाजिक कार्यात सहभाग आहे.
थेलेसेनिया या आजार ग्रस्त विद्यार्थ्यांसाठी सर दरवर्षी रक्तदान करतात.त्यांनी मारणोत्तर नेत्रदान सुद्धा करण्याचे ठरविले आहे पर्यावरण जनजागृतीसाठी महाराष्ट्र राज्य सायकल संमेलन पंढरपूर येथे मागील चार वर्षापासून सहभाग आहे. एनसीइआरटी दिल्ली, भोपाल व सीसीआरटी गुवाहिटी येथे राष्ट्रीय प्रशिक्षणामध्ये सहभाग आहे. विद्यालयामध्ये सतत गुणवत्ता वाढीसाठी काम आहे शाळेची विद्यार्थी संख्या तालुक्यात सर्वाधिक 1632 एवढी आहे शाळेत डिजिटल स्कूल, एनएमएमएस शिष्यवृत्ती, नवोदय यासारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये शेकडो विद्यार्थी दरवर्षी परीक्षेला बसवतात आजपर्यंत शिक्षक मठपती यांच्या मार्गदर्शनातून एनएमएमएस व शिष्यवृत्ती सारख्या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झालेले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा ठसा संपूर्ण जिल्हाभर उमटवलेला आहे त्यांची चिकाटी, जिद्द व मेहनत यामुळे त्यांना आज हा राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर्व स्तरातून आज शिक्षक मठपती यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here