Home महाराष्ट्र दर शनिवारी ‘ विना दफ्तर शाळा’ ; आंधळी गावातील शाळाचा नाविण्यपूर्ण उपक्रम

दर शनिवारी ‘ विना दफ्तर शाळा’ ; आंधळी गावातील शाळाचा नाविण्यपूर्ण उपक्रम

587

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड : मौजे आंधळी, तालुका माण, जिल्हा सातारा गावामध्ये लोकनियुक्त सरपंच, श्री. दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून पुढची पिढी सक्षम व सज्ञान बनवण्याच्या दृष्टीने गावातील सर्व शाळांमध्ये दर शनिवारी’ विना दप्तर शाळा’ हा नावीण्य पुर्ण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विविध उपक्रमाद्वारे मुलांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील वक्त्यांचे विचार ऐकण्यास मिळेल. मुलांचे कौशल्य वाढवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन दर शनिवारी करण्यात येत असते.
‘विना दफ्तर शाळा’ हा अनोखा उपक्रमा अंतर्गत यावेळी बहुचर्चित हुमान पुस्तकाच्या लेखिका, नगरपालिका माजी आयुक्त, संगिताताई धायगुडे यांना आमंत्रित केले होते. यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत व तोंडभरून कौतुक करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ‘मी कसा घडलो’ या विषयावर (माजी आयुक्त) संगिता ताई धायगुडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी धायगुडे मॅडम म्हणाल्या मी पण या शाळेत शिकले, आज या शाळेचा वेगवेगळ्या उपक्रमातुन चेहरा मोहरा बदल्याचा दिसतो. मी आज या गावातुन माझ्या शिक्षणाने व बुध्दीमतेच्या जोरावर मी जर्मनी सारख्या देशात जावुन, भारत देशाचे नेतुत्व केले आहे . हा अतिशय स्तुत्य उपक्रम पाहुन या माध्यमातुन विद्यार्थांच्यातील कला कौशल्यांना वाव मिळेल तसेच विविध वक्त्यांच्या विचारातुन प्रेरणा व मार्गदर्शन लाभेल, विध्यार्थांनी आपले आई वडील आपले गुरुजन यांचा आदर व सन्मान केला पाहिजे तसेच आपले ध्येय निक्ष्चित करुन त्यादृष्टीने वाटचाल केली पाहिजे.
विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करतानाच विविध शालेय उपक्रमात हिरिरीने सहभागी व्हावे. मात्र, विद्यार्थ्यांनी या वयात लक्ष विचलित करणाऱ्या समाज माध्यमांपासून कटाक्षाने दूर राहावे.”

सरपंच श्री. दादासाहेब काळे म्हणाले, “आमचे ध्येय गावातील पुढील पिढी सजग, सक्षम व सज्ञान बनविण्याचे आहे. त्यादृष्टीने आम्ही शाळांमध्ये विविध उपक्रम राबवीत आहोत. त्यातीलच हा एक अतिषय उत्कृष्ट असा हा उपक्रम आहे. या उपक्रमाला जि. प. शाळा आंधळीचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा व्यवस्थापण समिती व गावातील तरुण युवक ग्रामस्थ यांची मोलाची साथ लाभत असते, तसेच या नाविण्य्पुर्ण उपक्रमाच्या माध्यमातुन शाळेच्या विद्यार्थी पट संख्येत झपाट्याने वाढ होतानाचे दिसत येत आहे. हा उपक्रम असाच शतकानु शतके कायम सुरु ठेवण्याचा आमचा माणस आहे. यावेळी उपस्थित धायगुडे मॅडम ,सरपंच श्री दादासाहेब काळे, मुख्याध्यापक घनशाम काळे, दत्तात्रय मगर, अ‍ॅड. किशोर खरात , विजय गोरे, सुप्रिया चिरमे, माया वरकड, पत्रकार आकाश दडस, विध्यार्थी व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here