Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल येथे महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवाडा चे उद्घाटन !…. ...

महात्मा फुले हायस्कूल येथे महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवाडा चे उद्घाटन !…. जातीचे दाखले, डोमॅसाईल, नॅशनेलिटी व नॉन क्रिमिलियर कागदपत्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काढावे – लक्ष्मण सातपुते ( नायब तहसीलदार )

131

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १७ सप्टेंबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस ते २ ऑक्टोबर भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मोत्सव याचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवाडा चे उद्घाटन नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मंडळ अधिकारी ज्योती चौधरी, तलाठी विनोद पाटील, इच्छाकृपा कम्प्युटर तथा शितल अकॅडमी चे संचालक चेतन जाधव, बालाजी कम्प्युटर व सेतु सेवा केंद्राचे संचालक स्वप्निल भाटिया, प्रगती झेरॉक्स व सेतु सेवा केंद्राचे संचालक अण्णाभाऊ बच्छाव, कोतवाल खाटीक दादा उपस्थित होते.
या अभियाना अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, महाराष्ट्राचे व भारताचे रहिवासी दाखले, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर अशी विविध कागदपत्रे अल्पदरात मिळणार आहेत असे प्रतिपादन नायब तहसीलदार सातपुते यांनी करत विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. यानंतर चेतन जाधव, स्वप्निल भाटिया, अण्णाभाऊ बच्छाव यांनी देखील मनोगत व्यक्त केले व कागदपत्रांची विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी सातपुते साहेबांचे आभार मानत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभियाना अंतर्गत कागदपत्र काढावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार व्ही टी माळी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here