Home महाराष्ट्र वडिलांची पंच्याहत्तरी मुलींनी केली साजरी.

वडिलांची पंच्याहत्तरी मुलींनी केली साजरी.

351

*प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)* सुजाता नगर येथील ‘ कमलकांत ‘ निवास येथे उपा श्रीधर उमाकांत उबाळे यांची पंच्याहत्तरी त्यांच्या तिघी मुलींनी साजरी केली.यावेळी प्रा डॉ भीमराव खाडे,भानुदास साबळे,डॉ रामप्रसाद खंदारे,लता साळवी,भाचे राजू खांडे,पी आर पी नेते गौतम मुंडे,भगवान जगताप, डी. आर. तूपसुंदर,पी. टी. प्रधान,रामराव तालेवार,शुभम तालेवार,प्रा. रमेश कांबळे,भाची सुप्रिया जाधव,अक्षय जगताप मुलगी स्मिता कांबळे व जावई प्रा. गंगाधर कांबळे व अनिश ओव्हाळ यांनी
मनोगते व्यक्त केली.
सुरवातीला तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन चुलती सुमंगला उबाळे व पत्नी विमल उबाळे यांनी केले नंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
श्रीधर उबाळे यांचे वडील उमाकांत उबाळे गुरुजी यांनी फुले नगर व ग्रामीण भागात बुद्ध धम्म रुजविण्यासाठी लोकांना जागृत केले त्यांच्या सहभागातून बुद्ध विहार निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्या ठिकाणी श्रामनेर शिबिर घेऊन बुद्ध धम्म संस्कार करण्याचे काम केले.श्रामनेरांसाठी चीवराची व्यवस्था केली व धमाच्या गतीला चालना देण्याचे काम केले यातूनच विधायक गोष्टीसाठी पुढाकार घेतला तरुणांना व्यसनापासून दूर केले व शिक्षणाचे महत्व सांगत राहिले हे काम स्वतःची नोकरी सांभाळून प्रामाणिक व निस्वार्थ भावनेने केले.अनेकांना मोठे केले गरजूना मार्गी लावले.
त्यांचेच धाकटे सुपुत्र श्रीधर उबाळे हे वडिलांचा वारसा त्यांच्या परीने पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत.
श्रीधर उबाळे यांनी महाराष्ट्रात ‘ खानदेशचा मळा व मराठवाड्याचा गळा ‘ या ऑर्केस्ट्रा संचातील एक सूत्रसंचालक म्हणून तसेच रामकृष्ण ढेरे लिखित आम्ही चाललो कुठे?या नाटकातून लोकांना प्रबोधन करण्याचे काम नोकरी सांभाळून केले.त्यांची पत्नी व स्वतःला कोरोनाची लागण झाली पुढे गंभीर अवस्थेतून बाहेर पडले यासाठी अनेकांनी त्यांना साथ दिली.मुलगा गेल्यावर काही काळ खचले मात्र तीही वेळ काढली सर्व मुलींचे लग्न केले जावई देखील चांगले मिळाले.
मुलींनी पंच्याहत्तरी साजरी केली हे पाहून स्वतः भावूक होऊन आनंदाश्रूला वाट मोकळी केली.मोठी मुलगी स्मिता कांबळे मनोगतात म्हणाली आमच्या आई पप्पांनी केलेल्या संस्कारातून आम्ही घडलो आमच्या पप्पाणी आमचे चांगले केले,घरातील अचानक घडलेल्या धक्यातून आम्हाला बाहेर काढले व हिम्मत दाखविली याची जाणीव झाली.यावेळी मुली देखील भावूक झाल्या.उबाळे परिवाराचा मोठा गोतावळा त्यांना सदिच्छा देण्यासाठी त्यांच्या बहिणी -मेव्हणे लीला गंगाधर जवळेकर, उर्मिला डी एन कांबळे, प्रमिला एस एस खंडारे,भाचे मंगेश शिंदे, त्यांच्या विहीण प्रतिभा कांबळे तसेच भावजय कुसुम उबाळे, मुली स्वप्ना नितीन कांबळे व स्नेहा अमित ओव्हाळ यांची उपस्थिती होती.गावातील भावकी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेकांनी मनोगतात त्यांनी केलेल्या कार्याची महती सांगितली.
शेवटी त्यांचे व्याही तुळशीराम कांबळे यांनी रमाई व बाबासाहेबांचे गीत गाऊन वाहवा मिळविली नंतर उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here