Home महाराष्ट्र उमरखेड येथे सम्यक बुद्ध विहार समिती नव्याने गठीत-अध्यक्षपदी सिध्दार्थ दिवेकर तर कोषाध्यक्षपदी...

उमरखेड येथे सम्यक बुद्ध विहार समिती नव्याने गठीत-अध्यक्षपदी सिध्दार्थ दिवेकर तर कोषाध्यक्षपदी प्रफुल दिवेकर, सचिवपदी कुमार केंद्रेकर यांची सर्वानुमते निवड..!

180

 

उमरखेड (दिनांक 18 सप्टेंबर) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मध्ये सम्यक बुद्ध विहार समिती नव्याने गठीत करण्यात आली आहे. समित बुद्ध विहाराच्या विकास कामे व सौंदर्यकरण करण्याकरिता तसेच बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचे हेतूने या विहार समितीची कार्यकारणी एक मताने निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमार केंद्रेकर अध्यक्ष शांतीदूत समिती, हिराबाई दिवेकर माजी नगरसेविका, भंते कीर्तीबोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्यक बुद्ध विहार समिती च्या अध्यक्षपदी सामाजिक क्षेत्रात काम करणारे पत्रकार म्हणून आपले नावलौकिक करणार सिध्दार्थ दिवेकर यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताई इंगोले तर सचिवपदी शांतिदूत समितीचे अध्यक्ष कुमार केंद्रेकर, सह सचिवपदी कांचन दिवेकर तर कोषाध्यक्षपदी आझाद समाज पार्टीचे शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रफुल दिवेकर, कार्याध्यक्षपदी संतोष इंगोले, शुद्धोधन दिवेकर, संघटकपदी बेबाबाई गवंदे, भारती केंद्रेकर, भारताबाई दिवेकर तर सदस्य म्हणून तुषार पाईकराव, हिराबाई दिवेकर, उज्वला धबाले राखी धबाले, मधुबाला दिवेकर, गौतम दिवेकर, शांताबाई दिवेकर, संजय दिवेकर, संघमित्रा केंद्रेकर,आकाश श्रवले इत्यादी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सम्यक बुद्ध विहार समिती नव्याने स्थापन झाल्याने सर्व सामाजिक स्तरावरून या समितीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here