


*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड(सातारा ) : होळीचागाव, ता. खटाव, जि. सातारा येथील शाळा व्यवस्थापन समिती,जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत, होळीचागाव यांच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी रोज रात्री 7 ते 9 या वेळेत टीव्ही, लॅपटॉप व मोबाईल या सारखी उपकरणे बंद ठेवण्याचा सक्तीचा निर्णय घेण्यात आला. अशा आशयाचे बॅनर गावात लावण्यात आले.
या वेळेत महिला मालिका पाहण्यात तर विद्यार्थी मोबाईल पाहण्यात व्यस्त असतात. त्यांच्यातील संवाद कमी होत चालला आहे.परिणामी विद्यार्थी अभ्यासापासून दूर आभासी जगात वावरत आहे. शिवबाची अपेक्षा करणाऱ्या मातेने प्रथम जिजाऊचा त्याग लक्षात घ्यावा. महिलांनी या वेळेत टीव्ही बंद ठेऊन मुलांना मार्गदर्शन करावे या हेतूने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा लीना बारसिंग यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील, खटाव तालुक्यातील होळीचागाव गाव हे गाव 5 हजार लोकसंखेचे गाव आहे या गावामध्ये दरवर्षी गावाच्या हितासाठी काही न काही ठराव केला जातो. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, जि. प. शाळा आणि ग्रामपंचायत होळीचागाव यांनी यां गावातील रात्री 7 ते 9 या दरम्यान मोबईल घरातील टीव्ही बंद ठेवण्याचा संकल्प केला. मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. आपला व आपल्या मुलाचा संवाद झाला पाहिजे, असा एकमुखी निर्णय घेतला आहे.
आताच्या काळात मुलाचा व पालकांचा संवाद होत नाही. त्यामुळे मुलांनादेखील अभ्यासाचा ताण वाटत आहे. त्यामुळे अनेक मुले तणावाखाली राहत आहेत. विद्यार्थी तणावमुक्त झाला पाहिजे. आपला अभ्यास व आई वडिलांकडे लक्ष दिले पाहिजे. या अनुषंघाने होळीचागाव गाव गावातील नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.यां निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.














