Home महाराष्ट्र सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा संपन्न हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित...

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा संपन्न हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित ; महाबोधी महाविहार मुक्तीसाठी उपासक उपासिकानी केला संकल्प

279

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड (सातारा) : भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने महाबोधी महाविहार,महू जन्मभूमी व दीक्षाभूमी मुक्तीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथमतः येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करून जनसमुदाय यांनी गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेरव,जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे,तालुकाध्यक्ष ऍड.विजयानंद कांबळे,पूर्व व पश्चिम विभागाचे आजी-माजी पदाधिकारी,केंद्रीय शिक्षक बाळासाहेब जाधव,ट्रस्टी अरुण पोळ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड,वैभव गायकवाड,वंचितचे जिल्हा महासचिव गणेश भिसे,अमोल गंगावणे,बबन करडे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,सरचिटणीस गणेश कारंडे,रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले,सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे बी.एल.माने,ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश सावंत,दादासाहेब केंगार,विलास कांबळे,दिलीप भोसले, अंकुश धाइंजे,बाळासाहेब सावंत,अशोक भोसले,अनिल वीर,अशोक कांबळे,डी.एस. भोसले,प्रकाश फरांदे,उमेश खंडझोडे,आप्पा तुपे,प्रतीक गायकवाड,अक्षय कांबळे,संदीप जाधव,दादासाहेब कांबळे,दादासाहेब केंगार,भानुदास सावंत,अरुण जाधव, राजाराम भंडारे,रामचंद्र गायकवाड,प्रा.रमेश गायकवाड,रमेश मस्के,चंद्रकांत मस्के,अमर गायकवाड, रामदास गायकवाड,ऍड.हौसेराव धुमाळ,शिवनाथ जावळे,दिलीप जैन आदी जिल्ह्यातून आलेले सर्व संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते,उपासिका व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावोगावावरून येणारा जनसमुदाय पुतळा परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चात सामील होत होते.
सदरच्या मोर्चात भारतीय बौद्ध महासभेसह आंबेडकरी बहुजन समाजाच्या समविचारी तत्सम संस्था व संघटनांनी सहभागी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.
जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान व जेथे भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले त्या बुद्धगयातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे (सन१८९१) आद्य प्रणेते अनागरीक धम्मपाल यांच्या जयंती दिनानिमित्त तसेच दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति दिना निमित्त प्रथमत: येथील डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच करण्यात आली.महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती,महू जन्मभूमी आणि नागपूर दीक्षाभूमीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) बौद्ध महासभा भिख्खू संघ,समता सैनिक दल व आंबेडकरी बहुजन समाजाच्या समविचारी संस्था/ संघटनांच्यावतीने संपूर्ण देशभरातील सर्व मंत्रालयावर व जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच दिवशी जन आक्रोश मोर्चा आंदोलन करण्यात आल्याचे वृत्त आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः स्थापन केलेली बौद्धांची मातृसंस्था जी बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात, भारतीय बौध महासभेच्यावतीने डॉ.ऍड.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात बौद्ध इंटरवेंशन याचिका दि.२ ऑगष्ट २०२५ रोजी दाखल केली आहे.या अस्मितेच्या लढ्याला यशस्वी करण्यासाठी बौद्ध बांधवांनी या जन आक्रोश मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती.सरतेशेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून सांगता करण्यात आली.जिल्ह्यातील बौद्ध बांधव यांना भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून केलेल्या आवाहनानुसार भारतीय बौद्ध महासभा महिला व पुरुष जिल्हा,समता सैनिक दल,भारतीय बौद्ध महासभा सर्व तालुका शाखा आणि ग्रामशाखा,शहर शाखा आदींनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here