Home महाराष्ट्र ‘अढळ आस्था, श्रद्धा असेल तर समकत्वी होणे शक्य…’

‘अढळ आस्था, श्रद्धा असेल तर समकत्वी होणे शक्य…’

105

 

 

 

जळगाव – भगवती सूत्रमध्ये आठ प्रकारच्या दयेचा उल्लेख आहे. त्यात स्वदया, पर दया, द्रव्य दया, भावदया, निश्चय दया, व्यवहार दया, स्वरुप दया, अनुबंध दया याचे सोदाहरण सांगण्यात आले. द्रव्य दया ही दिखावटी दया असते, ज्ञान शून्य परंतु परंपरेने आलेले म्हणून करणे का? काय करायचे हे माहिती नसते यात. भावदया ही समजपूर्वक व ज्ञानपूर्वक केली जाते, निश्चय दया या प्रकारात परम उच्च कोटीची दया असते, १४ व्या गुणस्थानी ही दया असते मोक्ष जाण्या आधीची ही अवस्था असते. व्यवहार दया ही श्रावकांसाठी सांगितली आहे. स्वरुप दया आणि अनुबंध दया ही त्यातील भाव कोणते याबद्दल असते. याच प्रवचनात समकीतच्या ५ लक्षणांवर गेल्या प्रवचनापासून चर्चा सुरू आहे. आजच्या प्रवचनात ५ वे लक्षण म्हणजे आस्था, श्रद्धा विश्वास यावर चर्चा करण्यात आली. देव, गुरु, धर्म या विषयी दृढ श्रद्धा असावी, आस्था असावी हे उदाहरण पटवून देण्यासाठी देव, गुरू धर्म यांच्याविषयी अत्यंत विश्वास असलेल्या सुलसा आणि अंबर संन्यासी यांची गोष्ट सांगितली. श्रद्धावान सुलसाची श्रद्धा ढळावी यासाठी सन्यासी ब्रह्मा, विष्णू, महेश ही रुपे आपल्या मायावी शक्तीने घेतो परंतु सुलसाने आपल्या आस्थेला सोडले नाही, श्रद्धेत टिकून राहिली. इतकेच नव्हे तर त्याने तीर्थंकरांचे रुप घेतली परंतु तरीही ती अढळ राहिली. शेवटी अंबर सन्यासी सुलसाच्या आस्थेपुढे नतमस्तक होतो. मनात अतोनात आस्था, श्रद्धा असेल तर समकत्वी होणे शक्य होऊ शकते असे मोलाचे विचार प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी आजच्या धर्मप्रवचनात मांडले.
जीवन आनंदमयी बनण्यासाठी जिनवाणी किंवा सत्संग अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सत्संग घडला तर हाच जन्म नव्हे तर येणाऱ्या जन्माला देखील सुधारता येते असा श्रावक-श्राविकांमध्ये विश्वास जागविण्याचे काम प.पू. उन्नतीप्रभा जी म.सा यांनी आजच्या प्रवचनातून दिले. आपली संगत जर दुर्जनांसोबत असेल तर गुणवान देखील दुर्गुणी बनू शकतो. नेहमी सत्संगात असावे हे स्पष्ट करताना गुरुनानक यांचे उदाहरण दिले गेले. या धर्मसभेत मुमुक्षू धनश्री चोरडीया आणि मुमुक्षू सिद्धेश भुरट हे देखील उपस्थित होते. त्यांना अनुमोदना करण्यासाठी प.पू. उन्नतीप्रभजी म.सा. यांनी ‘वितराग की ओर बढ रहे है कदम…’ हे भक्तीगीत सादर केले. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावतर्फे त्यांचा हृद्य सन्मान ही करण्यात आला.

(शब्दांकन – किशोर कुळकर्णी, 94227 76759)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here