Home चंद्रपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव चा खो-खो संघ ठरला विजेता

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव चा खो-खो संघ ठरला विजेता

181

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा (११ सप्टेंबर) – क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय १४ वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगावच्या मुलींनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत मुलींनी उत्कृष्ट खेळाची छाप पाडत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद मिळवले व जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेकरीता त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या कामगिरीत अंबुजा फाउंडेशनच्या अदानी सिमेंट च्या CSR फंडातून विशेष सहकार्य करून विद्यार्थ्यांना ने आण करण्यात महत्वाची भूमिका बजावली.विजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी कल्याण जोगदंड, केंद्रप्रमुख पंढरी मुसळे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय अकनुरवार, अंबुजा फाउंडेशनच्या शिक्षण विभाग प्रमुख समन्वयक. सरोज आंबागडे, निलेश मडावी, मंगला चटप, रेखा झाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बंडू बोढाले व तालुका क्रीडा अधिकारी प्रमोद वाघाडे आदी मान्यवरांनी केले.
तसेच खेळाडूंना घडविण्यासाठी मेहनत घेणारे क्रीडा शिक्षक बाळकृष्ण गावंडे व अंबुजा फाउंडेशनचे क्रीडा व्यवस्थापक चैताली कन्नाके यांचाही विशेष अभिनंदन करण्यात आले.
मान्यवरांनी विजेत्या मुलींना व शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here