


प्रतिनिधी(अनिल साळवे, 8698566515)
विद्यार्थी जीवनामध्ये गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, गुरु हा विद्यार्थ्यांचा दुसरा पालक असतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षक मोलाची भूमिका बजावतात , विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये व त्यांच्यात नैतिक मूल्य रुजवण्यामध्ये शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कारण शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असतात असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षक गोपाळ मंत्री यांनी केले. दिनांक 9 सप्टेंबर रोजी गंगाखेड तालुक्यातील बालाजी विद्यालय, इसाद येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच शिक्षक दिन. आजचे शिक्षक हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानदानाचेच कार्य करतात असे नाही तर त्यांना प्रेरणा देणे, मार्गदर्शन करणे ,प्रोत्साहन देणे इत्यादी कामेही करतात म्हणूनच विद्यार्थी जीवनात शिक्षकाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्यध्यापक व्ही. एम. पौळ, जी. व्ही. गुरमे, जी. पी. ताडकुले, बी. व्ही. येनगे, एस. डी. जाधव, एन. एम. सय्यद , ए. ए. कवटकवार,आर. एस. अल्लडवार,आर. आर. फरकंडेकर, शैलेश सातपुते, प्रभंजन जाधव,गणेश सोळंके आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु गीतांजली भोसले, सूत्रसंचालन कु.ऋतुजा भोसले, तेजस्विनी कवडे तर आभार प्रदर्शन कु स्वरांजली भालेराव यांनी केले. हा कार्यक्रम इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता.













