Home महाराष्ट्र आद्य क्रांतिकारी उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी: प्रदीप विधाते यांनी केले स्वागत.

आद्य क्रांतिकारी उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी: प्रदीप विधाते यांनी केले स्वागत.

137

 

सातारा,खटाव,प्रतिनिधी: नितीन राजे. (9822800812)

आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त खटाव येथील नरवीर उमाजी नाईक मंडळाच्या युवकांनी जेजुरी येथून ज्योत आणली, या ज्योतीचे आगमन खटाव येथे छ.शिवाजी महाराज चौकात झाले यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष *मा.श्री. प्रदिपजी विधाते (आण्णा)* यांनी यावेळी उपस्थित राहून ज्योत सोहळ्याचे स्वागत केले.
या वेळी पिंपळेश्वर संघटनेचे पदाधिकारी व उमाजी नाईक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मा. सरपंच कॅप्टन बबनराव घाडगे, किशोरकाका डंगारे, रसूलभाई मुल्ला,मनोजजी देशमुख,एकनाथ चव्हाण, मुगुटराव पवार, दिलीप जाधव उमाजी नाईक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
ब्रिटिश राजवटीच्या जुलमी सत्तेविरुद्ध आवाज उठवणारे महाराष्ट्रातील पहिले क्रांतिकारक म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे उमाजी नाईक होते यांची जयंती ही उत्साहात साजरी होणे ही काळाची गरज आहे ,असे मत जिल्हा परिषदेचे माजी.उप अध्यक्ष प्रदीप विधाते यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास उमाजी नाईक मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here