Home महाराष्ट्र गिरणा धरणाचे पाणी नदीत न सोडता पाटात सोडा, शिवसेनेची मागणी ; पाटबंधारे...

गिरणा धरणाचे पाणी नदीत न सोडता पाटात सोडा, शिवसेनेची मागणी ; पाटबंधारे विभागाला निवेदन

105

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – गिरणा धरण १००% भरले असून, सध्या त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी नदीत वाया न घालवता, ते शेतीसाठी पाटात सोडावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर व तालुका शाखेने केली आहे. या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, धरणगाव यांच्या कार्यालयात निवेदन दिले.

यावेळी शिवसेना उपनेते, रावेर लोकसभा आणि नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात, “गिरणा धरणातून वाहणारे पाणी दहीगाव बंधाऱ्यातून कॅनालद्वारे थेट अमळनेर तालुक्यातील शेवटच्या चारीपर्यंत सोडण्यात यावे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये पाणी पाझरून (percolation) पातळी वाढण्यास फायदा होईल,” अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख आणि माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख भागवत चौधरी, युवा सेना उपजिल्हाप्रमुख हेमंत महाजन, युवा सेना शहर प्रमुख लक्ष्मण महाजन, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील, तालुका समन्वयक संतोष सोनवणे, लीलाधर पाटील, रणजित सिंग शिखरवार, रमेश चव्हाण, सतीश बोरसे, किरण अग्निहोत्री, जगदीश मराठे, प्रेमराज चौधरी, जीभाऊ पाटील, तसेच प्रसिद्धी प्रमुख गजानन महाजन यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here