


राजुरा ८ सप्टेंबर
अनंत चतुर्दशी निमित्त निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सुरक्षा व्यवस्थेत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आपली कर्तव्य पार पाडताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. कर्तव्यावर आलेले बहुतांश पोलीस अधिकारी हे बाहेरच्या तालुक्यामधून आलेले असतात. भूक तहान विसरून केवळ कर्तव्य बजावणाऱ्या आणि शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी आपले कर्तव्य बजावनाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना
रोटरी क्लब राजुरा दरवर्षी जेवणाचे पॉकेट व पिण्याच्या पाण्याच्या बॉटल वितरित करतात. राजुरा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत रोटरी क्लब राजुरा चे अध्यक्ष निखिल चांडक , सचिव राजू गोखरे , माजी अध्यक्ष कमल बजाज , नवल झवर, सारंग गिरसावळे , उपाध्यक्ष अमजद खान , कोषाध्यक्ष अभिषेक गंपावार व संपूर्ण सदस्य यांनी निर्णय घेऊन शंभर पॉकेट खाण्याचे पॉकेट वितरित करण्याचे ठरविले व तशी रीतसर पोलीस विभागाकडून परवानगी ही मागितली. यासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्याचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पॉकेट वितरित करीत असताना काही अधिकाऱ्यांनी तर अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया दिल्याने रोटरी क्लब च्या सदस्यांना आनंद झाला. राजुऱ्याचे पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, नगर परिषद राजुराचे मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांच्या सहकार्याच्या भावनांचा आदर करून व सर्व पोलीस अधिकारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. रोटरी क्लब राजुऱ्याच्या संपूर्ण टीम सदस्यांचे तथा केडी फूड जंक्शनचे व्यवस्थापक बबलू बघेल यांनी संपूर्ण जेवण पॅकिंगची व रोटरी लोगो लेबलिंगची जबाबदारी घेऊन उत्कृष्ट जेवण वाजवी दरात दिल्याबद्दल यांचे आभार मानले.













