Home महाराष्ट्र माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणं ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी :...

माणूसपणाला बंदिस्त करणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणं ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी : डॉ. डी. श्रीकांत स्मृतीशेष डी. जी. राजहंस, डॉ. वसंत भागवत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

146

 

 

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुस्तकी शिक्षण न देता पूर्वापार चालत आलेल्या शुद्ध माणूसपणाला बंदिस्त करू पाहणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणे, ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जेष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. डी. श्रीकांत यांनी केले. ते इंडियन टीचर्स फोरमच्या वतीने देण्यात येणारा सक्षम भारतीय नागरिक घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदान करत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून भरीव योगदान देणाऱ्या शिक्षक व शिक्षिकांना नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड वितरण प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.
यावेळी सिनेअभिनेते संजय मोहिते, विचारवंत जॉर्ज क्रुज, दिग्दर्शक अनिल म्हमाने, नॅशनल टीचर अवार्ड विजेते सागर बगाडे, डॉ. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर यांची भाषणे झाली.
मरणोत्तर स्मृतीशेष डी. जी. राजहंस गुरुजी यांच्यावतीने, श्रीकांत कांबळे व डॉ. वसंत भागवत यांना नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्काराने तर शंकर पुजारी (कोल्हापूर), सुलभा सावंत-देसाई (गोवा), सुनिता कांबळे-अंबेकर (दादरा आणि नगर हवेली), विजयकुमार कांबळे (सांगली), डी. सी. डुकरे (परभणी), विजयकुमार काळे (सातारा), मनिषा कांबळे (सांगली), बाळासाहेब बोडके (कोल्हापूर), महेंद्र रंगारी (अमरावती), सुवर्णा माने (कोल्हापूर), शैलजा परमणे (कोल्हापूर), स्वाती यादव (सातारा), प्रेमदास मेंढुलकर (चंद्रपूर), कविता पाचपोर-गीते (अकोला), शीतल वांढरे (अहमदनगर), डॉ. तनुजा परुळेकर (मुंबई), सुनिता सावंत (सांगली), सुनिल घाडगे (कल्याण), राजाराम डकरे (पन्हाळा), अर्जुन भोई (ठाणे), सुरेश कुंभलकर (यवतमाळ), सचिन गायकवाड (कोल्हापूर), अशोक भोसले (कोल्हापूर), विद्या नाळे (कोल्हापूर), विश्वनाथ पाटील (चंदगड), पल्लवी चौगुले (इचलकरंजी) यांना नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक ॲड. करुणा विमल यांनी सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर, अर्हंत मिणचेकर तर अंतिमा कोल्हापूरकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here