Home देश विदेश देवेंद्र फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

देवेंद्र फडणवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

418

 

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, 9423608179

 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असे समजते. सध्या भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा हे कार्यरत आहेत. परंतू ते केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे. देशाच्या विविध भागात निवडणुका असल्यामुळे वेळोवेळी त्यांचा कार्यकाल वाढविण्यात आला.
गेल्या वर्षभरापासून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? याची चर्चा मिडीयात खूप जोरदार सुरू आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंञी अमित शहा यांच्या मर्जीतील अध्यक्ष असावा असे सत्तेतील लोकांना वाटत होते. परंतू भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना असे वाटत होते की, संघाशी एकनिष्ठ व या विचारसरणीचाच माणूस अध्यक्षपदी असावा.

गेली वर्षभर अनेक नावे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टी यांच्याकडून समोर आली .परंतू त्या नावावर दोन्ही बाजूचे एकमत होत नव्हते. यामध्ये संजय जोशी, नितीन गडकरी, वसुंधरा राजे शिंदे, शिवराजसिंग चव्हाण, डी.पुरंदेश्वरी, योगी आदित्यनाथ ,विनोद तावडे, मनोहरलाल खट्टर, ओम माथुर, उमा भारती, राजनाथसिंग, राम माधव इ. ४० ते ५० नावे समोर येऊन एकाही नावावर संघ व भाजपाच्या नेत्यांचे एकमत होत नव्हते.

सातत्याने विचारमंथन सुरू होते. भाजपाच्या घटनेनुसार देशातील अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांच्या अध्यक्षांच्या निवडणुका पार पडल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होते असा निष्कर्ष काढल्या जात होता.

संघानेही यावेळेस जबरदस्त खटाटोप केल्याचे कळते. कारण पक्ष संघटन आपल्या हाती असावे, संघातील काही मंडळींना वाटत होते. अतिशय सखोल विचारमंथनानंतर संघ व भाजप या दोघांनाही चालणारे नाव म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस हे जर भविष्यात राष्ट्रीय अध्यक्ष झालेच तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंञीपदी चंद्रशेखर बावनकुळे, महसुलमंञी, पंकजा मुंडे, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. विभागीय समतोल साधण्याकरिता या नावात फेरबदल होवू शकतो. देशाचे रस्ते वाहतुकमंञी नितीनजी गडकरी यांना मुख्यमंञीपद मिळू शकते. परंतू ते स्वतः हे पद घेण्यास इच्छुक नाहीत. ते दिल्लीत स्थिरावले आहेत व खूप चांगले काम करीत आहेत. देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here