Home चंद्रपूर पदावर नसतांनाही निमकर सामाजीक बांधीलकी जपत सत्काराच्या माध्यमातून देतात प्रेरणा-हंसराज अहिर

पदावर नसतांनाही निमकर सामाजीक बांधीलकी जपत सत्काराच्या माध्यमातून देतात प्रेरणा-हंसराज अहिर

97

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार

 

 

राजुरा – राजुरा विधानसभा क्षेत्रात शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायीक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करून पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शाळा, शिक्षक, उद्योजक तसेच उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा सत्कार करून माजी आमदार निमकर हे अनेक वर्षांपासून कोणत्याही पदावर नसतांनाही सामाजिक बांधिलकी जपत इतरांना प्रेरणा देण्याचे काम करत आहे असे मत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सत्कार सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परीवारातर्फे ५ सप्टेंबर ला जिमनॅशियम सभागृह राजुरा येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, तर प्रमुख पाहुणे माजी आमदार अॅड. संजय धोटे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बँकचे संचालक सुदर्शन निमकर, जिल्हा सहकारी बँकचे संचालक विजय बावणे, विमाशी चे माजी अध्यक्ष केशवराव ठाकरे, ज्येष्ठ नेते सुरेश केंद्रे, शिवाजी शेलोकर, अरुण मस्की, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा ग्रा.पं. कळमना चे सरपंच नंदकिशोर वाढई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, उद्योजक नीलेश ताजने, चुनाळा चे सरपंच बाळनाथ वडस्कर , प्रा. संभाजी वारकड सह मान्यवर उपथित होते.
या कार्यक्रमाचे नियोजीत प्रमुख अतिथी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार तथा वि.मा.शि. चे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी शिक्षक दिनाच्या अन्य कार्यक्रमात व्यस्त असतांना या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा, मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धा पुरस्कार प्राप्त शाळांच्या मुख्याध्यापका सह शिक्षकांचा, आर. आर.(आबा)पाटील सुंदर गाव योजना पारितोषिक प्राप्त ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तर कुपोषण मुक्त चळवळीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल बाळू स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित महाजनवार, लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त (दुग्ध व्यवसाय उद्योजक) निलेश ताजणे व संतोष मोतेवाड, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सुधाकर चंदनखेडे, अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे संतोष कुंदोजवार, योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा.दत्तात्रय मोरे, प्रा. सुनिता अरुण जमदाडे यांचाही पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
माजी आमदार सुदर्शन निमकर हे आपल्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा साजरा न करता शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे, महिला मेळावे, स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी शेतकरी मेळावे, तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रात शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायीक, आध्यात्मिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य कार्य करणाऱ्यांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जपून या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना नवी प्रेरणा देण्याचे काम करीत आहे. एकदा निवडणूक जिंकली की आपण त्या मतदारांचे ऋणी होतो व आयुष्यभर त्यांचे ऋण फेडणे हे राजकीय क्षेत्रात काम करणार्‍याचे कर्तव्य आहे या हेतूने निमकर हे काम मागील अनेक वर्षापासून अविरत कार्य करत आहे.
प्रथम सकाळी चुनाळा येथील ग्रामस्थांच्या वतीने निमकररांच्या दीर्घायुष्यासाठी श्री तिरूपती बालाजी देवस्थानात महाआरती करण्यात आली. ग्रा.पं. चुनाळा येथे वृक्षारोपण, राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व रूग्णांना फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. अगदी वेळेवर आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here