Home यवतमाळ युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र युनिट पुसदतर्फे भव्य रक्तदान शिबिर- तब्बल १२० बाटल्या...

युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र युनिट पुसदतर्फे भव्य रक्तदान शिबिर- तब्बल १२० बाटल्या रक्तसंकलन:पैगंबर (स.) जयंती निमित्त एक आगळावेगळा उपक्रम

185

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी, पुसद (यवतमाळ), मो.78751 57855

 

पुसद (प्रतिनिधी) :
युथ मूव्हमेंट महाराष्ट्र युनिट, पुसद यांच्या वतीने रविवारी शहरातील गुलाम नबी आझाद शिक्षण संकुल पुसद येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास पुसद शहर व परिसरातील युवकांनी व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमात तब्बल १२० बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले.

या शिबिरासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ रक्तपेढीच्या टीमने तांत्रिक सहाय्य व संकलनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. डॉ.गोपी गौरव, रक्त संकलन अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ उपस्थित होता. प्रत्येक रक्तदात्याची आरोग्य तपासणी करूनच रक्तदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शेख नईम यवतमाळ जिल्हासंघटक जमाअते इस्लामी हिंद (दक्षिण) यांच्या हस्ते झाले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मिर्झा नवेद बेग जिल्हा संघटक जमाअते इस्लामी हिंद यवतमाळ (उत्तर) हे उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “रक्तदान हे श्रेष्ठ दान असून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो. तरुणांनी या सामाजिक कार्यात पुढाकार घेणे अभिमानास्पद आहे तसेच युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या कार्याची स्तुती केली.” या स्थळी मंचावर जमाअते इस्लामी हिंद पुसद शहर अध्यक्ष काजीम दाद खान,डॉक्टर गोपी गौरव व युथ मूव्हमेंट महाराष्ट्र ज़िल्हाध्यक्ष डॉक्टर अतिब उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैय्यद सलमान सरांनी केले

युथ मूव्हमेंट महाराष्ट्र युनिटचे पुसद तालुकाध्यक्ष मिर्झा अस्लम बेग यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र थोडक्यात परिचय करून ब्लड डोनेशन कॅम्प मागील उद्देश सांगितले तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी संघटनेमार्फत हजारोच्या संख्येने रक्त संकलन केल्या जाते असे आवर्जून सांगितले. पैगंबर(स.) यांच्या जन्मदिनानिमित्त समाजामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येते परंतु युथ मूव्हमेंट संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी ब्लड डोनेशन कॅम्पचे आगळे वेगळे आयोजन होते विशेष म्हणजे सोबतच आलेल्या डॉक्टर टीमला संदेश विभाग तर्फे प्रेषित चरित्र पुस्तकांची भेट देण्यात आली .यानंतर उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सदर कॅम्प युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र पुसद युनिट समस्त पदाधिकारी व त्यांचे सहकारी शेख मुदस्सीर,मुदस्सीर अहमद,ज़ुलकरनैन, इरफान कुरेशी व मोहम्मद वसीम यांच्या प्रयत्नातून हे शिबिर यशस्वी झाले.रक्तदात्यांना प्रमाणपत्र,अल्पोपहार व आभार भेट देऊन गौरविण्यात आले.

आयोजकांनी भविष्यात अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन अधिक मोठ्या प्रमाणावर करण्याचे आश्वासन दिले.या समाज उपयोगी उपक्रमाचे कौतुक सर्व शहरात होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here