Home महाराष्ट्र जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना घरपट्टी माफ

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना घरपट्टी माफ

248

खटाव प्रतिनिधी/ नितीन राजे
खातगुण ता. खटाव जिल्हा सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आपली मुले शिकवणाऱ्या सर्व पालकांची घरपट्टी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते खातगुण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. फक्त तू थकबाकीदार नसावा.

मौजे खातगुण तालुका खटाव जिल्हा सातारा ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली होती. त्यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली, अनेक प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यात आलेयामध्ये मोठा ऐतिहासिक एक निर्णय घेण्यात आला, सध्या प्राथमिक शाळेला लागलेली पडझड रोखण्यासाठी व प्राथमिक शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी खातगुण प्राथमिक शाळेत आपली मुले शिकवणाऱ्या सर्व पालकांची घरपट्टी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या निर्णयाबद्दल वेळोवेळी जिल्हा परिषद शाळेसाठी वेळ देणारे तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी
प्रयत्नशील, राजकीय सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे, येथील विविध कार्य. सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विजय लावंड यांनी या निर्णयाचे स्वागत करून अभिनंदन केले. व या पुढील काळातही ग्रामपंचायत व शाळेच्या येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील राहू असेही यावेळी मा. चेअरमन विजय लावंड यांनी आपले मत व्यक्त केले आहे. खातगुण ग्रामपंचायतचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, तसेच मा. गटविकास अधिकारी यांचे वतीने अभिनंदन करून आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here