


📡 किशोर बावणे/ पुरोगामी साकोली मिडीया •
🛑 ब्रिटिशकालीन राजवटातील सर्वात जूनी तहसिल साकोली शहर व सेंदूरवाफा मिळून कितीतरी वर्षांनी या दोन्ही ग्रामपंचायतला “नगरपरिषद” चा दर्जा मिळाला. जनताही स्मार्ट शहर पहायला उत्सुक होती. सन २०१६ मध्ये निवडणूक संपली. आणि २०१७ पासून सुरू झाला हा अत्यंत लुटमारीचा खेळ. पहिलाच आलेला पथदिवे व बालोद्यान निधीत “थुकपॉलीश लोखंडी सामान” आणून जागोजागी ठेवले व दाखविले हा पहा “गावठी गार्डन” आणि पथदिव्यातही बिलींग कमिशन ठेकेदारी घोटाळा ( ०७/०५/२०१७ ). हे कार्य २०१७ ते २०१९ पर्यंत चालले व बिना संडासाचे खेडेगाव पर्यंत आले. कोटींचा गल्ला येऊनही एक सुलभ शौचालय काय तर साधे मुत्रीघर नाही. त्यानंतर ०८/०५/२०१९ ला पटमैदानात बाजार स्थानांतरणला लाखो रुपये मुरूमात, हायमास्ट लाईट, जेसीबीत फुंकले. त्याचाही जनतेच्या पैशाचा चुराडा. १८/०६/२०१९ ला अग्निशमन वाहन आले. पण काहींच्या चेहर-यावर १२ वाजले होते. कारण “ती” आली नसती तर हे फायर ब्रिगेडही डकरून बसले असते. नंतर सुमारे “एका महान” लुटवंत कुख्याभिकारी काळात घनकचरा व्यवस्थापन टेंडर आले. त्यातही “तो” करोड लूटमार करून पळाला. व काही लुटवंतांना मालामाल करून ठेवले. ही बाब १२/०२/२०२० पासून काही स्थानिक मिडीयाने सोशल मिडीयातून उचलून धरली तर येथे १९/०२/२०२० ला दु. ११:४० ला वि.प.स. आमदार डॉ. परीणय फुके यांनी नगरपरिषदेत “लुटमारांची” क्लास लावली. त्यात नगराध्यक्ष “वारलाच” मेडीकल रजेवर गेले होते. मग प्रकरण कुठे “सेटींग” मध्ये शांत झाले माहिती नाही. नंतर कोरोना काळ लागला त्यातही काहींनी कामे आणून “ठेकेदार – ठेकेदारीन” ची भूमिका साकारून कमिशन लाटले. २७/०८/२०२० ला आपसी विसंवादाने नगरपरिषदेत मासिक सभाच गायब करून ठेवली. त्यात काही जागृत व पारदर्शक वकील नगरसेवक हे २९/०८/२०२० ला जिल्हाधिकारी भंडारा येथे तक्रार घेऊन पोहचले होते.
🛑 यापूर्वीही लुटमारीचा पाचवा खेळ हा की, २१/०६/२०१९ ला विविध प्रभागात सिमेंट रस्ते व इतर ५ कामांची ३,५९,६९७८६/-रू, ८,४४,३१५/- रू, ४,४५,२५४/- रू, २४,०३,०८६/-रू, ३८,७३,३७७/- रूपयांची निविदा काढली. यात कोट्यवधी रुपयांची कुठे कामे झाली ती जनतेला थांगपत्ताच नाही. व तीच रक्कम कोणते बंगले कोणत्या महानगरात गेले, कोणत्या जागा जमिनी खरेदीत गेले हे आता आता जनतेतून समोर येत आहे. त्यानंतर काही जागृत लोकांनी सोशल मिडीयाच्या अश्या बातम्यांना दुजोरा देत सेंदुरवाफा येथील हजारो जनतेच्या असंख्य स्वाक्षऱ्यांसह ०४ मार्च २०२१ ला सेंदूरवाफा पूर्ववत ग्रामपंचायत करा असे निवेदन निवडणूक आयोगाला दिले होते हे खरे आहे. कारण सुमारे ३६ ते ४५ कोटी काही लाखांचा निधी येऊनही साधे मुत्रीघर बांधू शकले नाही मग येवढा पैसा अखेर गेला कुठे.? हीच मालिका “साकोली मिडीया” या समाजमाध्यमाने निरंतर सुरू केली. यात “बिना संडासाचे खेडेगाव”, २०१७ ते २०२२ संपूर्ण निधींचा लेखाजोखा हिशोब जनतेसमोर मांडा, कारण आजही शहरात “लोटा बॉटल धर तलाव पकड” स्थिती निर्माण आहे. यातच एका कॉंग्रेस शहराध्यक्षाने हे निवेदन दिले होते. पण लोकप्रतिनिधींनी सुद्धा दूर्लक्ष केले. आज साकोली सेंदूरवाफा शहरातील ज्या ज्या प्रभागात सिमेंट रस्ते व नाली बांधकाम झालेले आहेत ते सर्व भ्रष्टाचारात उखडून फाटलेले आहेत. याचाच अर्थ असा की, काही विशिष्ट बोगस ठेकेदारांना धरून २० रुपयांचे काम ५ रूपयात करायचे व उरलेले १५ रुपये आपसी स्वार्थ साधून आपली पहिले घरे भरायची व मतदार जनतेला टाकायचे चूलित. त्यांसोबत “स्मार्ट शहर” नावावर चक्क फसवणूक करायची.! हे काम कुणी केले. काही लुटमार लोकांनी व त्याला सततपणे उजेडात आणायचे काम फक्त येथे सोशल मिडीयातूनच झालेले आहे. कुणीही कोणत्याही वृत्तपत्र माध्यमातून जनतेसमोर हा भयंकर महाघोटाळा समोर आणलेला नाही. कारण काय.? तरीसुद्धा तेव्हापासून लपूनच बसले होते की कमिशनात केव्हा केव्हा अजून शासकीय निधी येतो त्याची वाट पाहत नगरपरिषदेच्या चकरा मारीत होते. हेच सत्य स्थिती अजूनही जनतेसमोर येण्यास आहे. कारण जोपर्यंत येथे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, आयकर विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( एसीबी ) ही निष्पक्ष पारदर्शक चौकशी करून त्या दोषींना समोर आणनार नाही तोपर्यंत साकोली सेंदूरवाफा हे गाव “लुटमार भ्रष्टाचारातच” अजून महा सत्यानाश होणार आहे हे लिहून ठेवा. कारण काहींनी काहींच्या माध्यमातून एका प्रभागात चक्क वनहक्क जंगल जागा एका खाजगी “खोमाजी डांभूळकर चहाविद्यालय” ला एका मोठ्या किंमतीत विकली, व असेच जागा कुठे कुठे विकण्याचा सपाटा कुणीकुणी लावला.? हे सर्व प्रकार कुणी दाबला हे सत्य लवकरच एका जागृत शासकीय अधिकारींमुळे जनतेच्या समोर येणार आहे हे नक्की..!
🛑 आता येवढे काही समोर असून एका मिडीयाच्या “बिना संडासाचे खेडेगाव” या एपिसोड वारंवार दणक्याने शहरात दोन सुलभ शौचालये निर्माण झालीत. पण यावर कुणीही माजी नगरसेवक, भावी नगरसेवक यांनी कोणतेही आजपर्यंत निवेदन दिलेले नव्हते. किती निधी आला, किती खर्च झाला, हे जनतेसमोर मांडा हा विषय कुणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी उचलला नाही. एकुण सिमेंट रस्त्यांवर २०१७ ते २०२४ पर्यंत एकुण किती घबाड व टेंडर मॅनेज आहे हा सुद्धा विषय कुणीही उचलण्याची हिंमत दाखवली नाही. फक एक “साकोली सोशल मिडीया” याद्वारेच ही सर्व प्रकरणे आज जनतेसमोर आली आहेत असे वक्तव्य एका नामांकित वैद्यकीय अधिकारींनी काल सोम. २५ ऑगस्टला स्वतः मिडीयासमोर बोलून दाखविले आहे. मग हे ८ वर्ष कुठे लपून दडून बसले होते. आणि आता निवडणुका लागल्या की परत लुटमार दूकानदारी सुरू करण्याचे षडयंत्र करायला आपले थोबडे चमकविण्यासाठी काय जनतेसमोर येतात काय.? दि. ०९/०८/२०२५ ला सिव्हिल वार्डात प्रबुद्ध चौकातून मिडीयाला जातानी पाहीले व तीन महिला बोलल्या की, “आता फक्त “तीला” वोट मागायला दारात ये म्हणा, नाही पायातली चप्पल फेकून तोंडावर मारली तर ××××बाई नाव नाही माझे” या शब्दात बोलली. म्हणजेच ब्रिटिशकालीन राजवटापासून मुख्य तहसिल शहर साकोलीचा एकुण करोड रुपयांचा महा सत्यानाश करून ठेवला असेल. आता काही जागृत शिक्षित जनता म्हणतात की हे सर्व प्रकार एका सोशल मिडीयातूनच आम्हाला माहीत झाले आहेत. याची आता तर उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आणि यातील जो कुणी वरीष्ठ अधिकारी, काही पदाधिकारी व नगरसेवक दोषी असतील त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हायलाच हवी. कारण हा मतदार जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा लूटणा-यांना माफ करू नका हे शब्द आज प्रत्येक जनतेत आहेत. म्हणूनच आज काही नुसते दाखवेपणासाठी आपले थोबाडातून विविध सणाला शुभेच्छा देत जनतेसमोर पुन्हा चमकवित आहेत. अश्या संधीसाधू व वैयक्तिक स्वार्थ साधणा-या लुटमारांना ओळखा व वेळीच दणका द्या असे आवाहन महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य वतीने केलेले आहे. कारण शासनाचा जनहितार्थ कार्यासाठी आलेला पैशाची अफरातफर करणे हे महाराष्ट्र शासन मान्य पत्रकारांना आवडत नाही. आणि याची उच्चस्तरीय चौकशी करून अपहार केलेला संपूर्ण पैसा त्यांकडून वसुल करीत शासनजमा झाला पाहिजे हीच मागणी करण्यात आली आहे.














