Home चंद्रपूर तेल काढणी युनिट व गोदाम बांधकामासाठी अर्ज करा-अंतिम मुदत 19 ऑगस्टपर्यंत

तेल काढणी युनिट व गोदाम बांधकामासाठी अर्ज करा-अंतिम मुदत 19 ऑगस्टपर्यंत

144

 

 

उपक्षम रामटेके, कार्यकारी संपादक, मो. 98909 40507

*चंद्रपूर, दि. 19 :* राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2025-26 करीता तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री आणि उपकरणे तसेच तेलबिया प्रक्रिया युनिट (प्रमुख आणि दुय्यम तेलबिया) या घटकाचे जिल्हयास एक लक्षांक प्राप्त आहे. यासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के कमाल 9 लक्ष 90 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. ज्या ठिकाणी गळीतधान्य पिके घेतली जातात तथापि तेल काढणी युनिटची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी तेल काढणी युनिट स्थापन करता येईल. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार लुधियाना व यासारख्या इतर केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या Mini Oil Mill/Oil Expeller ची उत्पादकनिहाय तेलघाणा मॉडेलला सदरील अनुदान अनुज्ञेय राहील.
ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून सदर घटकासाठी शेतकरी उत्पादक संघ/कंपनी इच्छुक अर्जदार संस्थेने केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडारण योजना/नाबार्डच्या मार्गदर्शक सूचर्नानुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी, सदर बाबीच्या लाभास पात्र राहील. तालुका कृषी अधिकारी यांनी अशा अर्जदारांचे अर्ज पूर्वसंमतीकरिता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे 19 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करावे.
*गोदाम बांधकामासाठी अर्ज :* राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2025-26 करीता गोदाम बांधकामाचे जिल्हयास 1 लक्षांक प्राप्त आहे. ज्या ठिकाणी गळीत धान्य पिके घेतली जातात तथापि गोदामाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी गोदाम बांधकाम करावे. 250 मे. टन गोदामाचे बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 12 लक्ष 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.
सदर घटकासाठी शेतकरी उत्पादक संघ/कंपनी इच्छुक अर्जदार संस्थेने केंद्र शासनाच्या स्मार्ट /वखार महामंडळ यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र राहील. तालुका कृषी अधिकारी यांनी अशा अर्जदारांचे अर्ज पूर्वसंमतीकरिता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे 19 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here