Home चंद्रपूर इन्फंट काँन्व्हेंट येथे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन.

इन्फंट काँन्व्हेंट येथे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन.

288

राजुरा (ता.प्र) :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस हायस्कूल, राजुरा येथे शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका व भविष्यासाठी शिक्षण धोरणे आणि तंत्रे याबाबतची माहिती देण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यात अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, सक्रिय शिक्षण , अनुभवात्मक शिक्षण , मिश्रित शिक्षण , केस- बेस्ड लर्निंग , संशोधन – केंद्रित शिक्षण, आंतरविद्याशाखीय शिक्षण , मार्गदर्शन आणि सल्ला , तंत्रज्ञान एकत्रीकरण , मूल्यांकन , जागतिक शिक्षण अशा विविध बाबीचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक श्री. अजय फुलझेले, सहमार्गदर्शक सदन मलिक व आशिष सर हे होते.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका या कार्यशाळेला उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन साक्षी चव्हाण यांनी केले तर आभार अमर मेश्राम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here