Home चंद्रपूर चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी शासनाला जिल्हा निर्मिती समितीच्या वतीने दिले निवेदन

चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी शासनाला जिल्हा निर्मिती समितीच्या वतीने दिले निवेदन

137

 

चिमूर- चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीची अनेक वर्षा पासूनची मागणी प्रलंबीत असून शासन स्तरावर सातत्याने निवेदने देत असून चिमूर क्रांती जिल्हा संघर्ष समितीचे वतीने ५ जानेवारी व ९ ऑगस्ट ला निवेदन देत असतात. ११ऑगस्ट ला चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अप्पर जिल्हाधिकारी थीटे मार्फत निवेदन देण्यात आले.

भारतीय स्वातंत्रलढ्यात चिमूरकरानी प्राणाची आहुती देत मोलाची भूमिका बजावली होती. त्यात बालाजी रायपूरकर हा युवक स्वातंत्र्यासाठी शहीद झाला. त्यामुळे क्रांती भूमी आहे. ताडोबा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्याघ्र प्रकल्प आहे. कोळसा खाण, वनस्पती ने नटलेला परिसर आहे. रामदेगी, मुक्ताई, सात बहिणी डोंगर असे पर्यटन स्थळ आहे. तसेच चिमूर हे चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली जवळ पास १०० किमी दरम्यान आहे.
चिमूर क्रांती निर्माण करण्यासाठी स्वातंत्रसंग्राम सैनिक स्व. काळे गुरुजी यांनी ४५वर्षापूर्वी पासून चळवळ उभी केली होती आणि आजही चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती च्या माध्यमातून लढा सुरु आहे.

अप्पर जिल्हाधिकारी थीटे व उपविभागीय अधिकारी घाडगे यांना निवेदन देत असतांना केशवराव वरखेडे, प्रा संजय पिठाडे, डॉ. दिलीप शिवरकर, सुभाष शेषकर, रमेश खेरे, प्रा. महादेव पिसे, डॉ महेश खानेकर, ऍड. महेशदत्त काळे, ऍड. सोनू श्रीरामे ऍड. सुभाष नन्नावरे, ऍड. शैनेशचंद्र श्रीरामे, ऍड. संदीप हिंगे, ऍड. नितीन रामटेके, ऍड. मुरकुटे, रवी मासुरकर, धर्मदास गेडाम, मोतीराम कुळमेथे, पठाण सर, कैलास रायपुरे सह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here