Home अमरावती प्रा.बनसोड यांच्या “शेतकऱ्यांचे कैवारी”या पुस्तकातील विचार हे दीपस्तंभाप्रमाणे प्रेरक- लेडी गवर्नर डॉ....

प्रा.बनसोड यांच्या “शेतकऱ्यांचे कैवारी”या पुस्तकातील विचार हे दीपस्तंभाप्रमाणे प्रेरक- लेडी गवर्नर डॉ. कमलताई गवई

255

 

 

 

अमरावती (प्रतिनिधी )
” समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांचे सामाजिक कार्य हे गेल्या अनेक वर्षापासून सर्व परिचित आहे .या पुस्तकातील विचार हे दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देणारे आहेत.शेतकरी हा कायमचा कर्जमुक्त झाला पाहिजे यासाठी महात्मा फुलेंनी शेती व्यवसायात स्वतः आधुनिक तंत्राचा वापर केला .त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांना कार्यान्वित केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कायमस्वरूपी थांबू शकतात. असा मौलिक सल्ला या पुस्तकातून लेखकांनी दिला आहे . विपश्यना हे कुठलेही कर्मकांड नाही विपश्यनेमुळे प्रत्येकाला समाधान व आनंद मिळतो . म्हणून प्रत्येकाने उपश्यना करावी .” असे विचार लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ .कमलताई गवई यांनी व्यक्त केले.
त्या दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी कमलपुष्प,काँग्रेस नगर, अमरावती येथे लेखक प्रा. श्रीकृष्ण बनसोड लिखित ” शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा फुले आणि ओळख कर्तृत्वाची ” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी विचार अध्यक्षपदावरून व्यक्त करीत होत्या.
या पुस्तक प्रकाशनाच्या अध्यक्षा लेडी गव्हर्नर प्राचार्या डॉ.कमलताई गवई,प्रमुख अतिथी डॉ.अनिल सावरकर, प्राचार्य डॉ. कमलाकर पायस,समीक्षक डॉ.रजिया सुलताना,सत्कारमूर्ती अभंगकार प्रा.अरुण बुंदेले,डॉ.अशोक उमप,पत्रकार श्री नयन किसनराव मोंढे,प्रबोधनकर्ते सुशीलदत्त बागळे होते.
सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी “क्रांतिज्योती ” या स्वरचित वंदनगीताचे सुमधुर आवाजात गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले .
याप्रसंगी अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांचा त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल,डॉ.अशोक उमप आणि सेवाभावी पत्रकार श्री नयन किसनराव मोंढे यांचा त्यांच्या समाज सेवेबद्दल कार्यक्रमाच्या अध्यक्षा लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गवई व मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

——

महात्मा फुलेंनी सकल मानव जातीच्या कल्याणासाठी लढा दिला- प्रा.श्रीकृष्ण बनसोड

 

“महात्मा फुलेंनी मनुवादी संस्कृती विरुद्ध संघर्ष करून मानवतेची नवीन विद्रोही चळवळ उभी केली.त्यांनी सकल मानव जातीच्या उद्धारासाठी लढा दिला ; त्यामुळे त्यांच्या क्रांतिकार्याला एका विशिष्ट जाती धर्माच्या चौकटीत बंदिस्त करणे म्हणजे त्यांच्या कार्यावर अन्याय करण्यासारखे होईल .” असे प्रास्ताविक भाषणातून प्रा बनसोड यांनी विचार व्यक्त केले.

—-

प्रा.बनसोड हे महात्मा फुलेंची विचारमूल्ये समाजात रुजवितात -डॉ. रजिया सुलतान

 

” पुस्तकाच्या माध्यमातून प्रा.बनसोड हे महात्मा फुलेंची विचार मूल्ये समाजात रुजविण्याचे कार्य करीत आहेत.ते फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहेत. शेतकऱ्यांचे बळी जाणे थांबले पाहिजे या विचारातून त्यांची सामाजिक दृष्टी दिसून येते. या पुस्तकातील प्रत्येक शब्द हा बोलका असून अभ्यासपूर्ण मांडणीतून लेखकाची शोधक बुद्धी दिसून येते .”असे विचार व्यक्त केले
श्री अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.अनिल सावरकर यांनी,”प्रा श्रीकृष्ण बनसोड यांचे कार्य फुले- शाहू- आंबेडकरांच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचविणारे असल्याचे सांगून संत श्री अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या सेवाभावी कार्याची माहिती त्यांनी दिली.

——

प्रा.श्रीकृष्ण बनसोड करीत आहेत
लेखणीतून समाजप्रबोधन- प्रा.अरुण बुंदेले
” लेखक प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी आजपर्यंत तेरा पुस्तकाचे लेखक केले असून आपल्या लेखणीतून त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य ते सतत करीत आहेत .कारण समाजामध्ये असलेल्या विविध समस्या तसेच विविध थोर पुरुषांचे पुरोगामी विचार त्यांनी पुस्तकाच्या व भाषणाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले आहे व करीत आहेत.”असे विचार प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
प्रबोधनकार श्री सुशीलदत्त बागडे यांनी” मी महात्मा फुले बोलतो ” हा एकपात्री प्रयोग अतिशय दमदारपणे सादर केला.
याप्रसंगी सर्वश्री भैय्यासाहेब उपाख्य वसंतराव गवई, प्राचार्य डॉ. सुरेश पाटील,अशोकराव दहिकर, ॲड.प्रभाकर वानखडे, वसंतराव भडके, डॉ.शिवलाल पवार, साहेबराव लव्हाळे,माजी कारागृह अधिक्षक कमलाकर घोंगडे, सुभाष शिंदे, प्रा.प्रकाश तडस ,विनोद अडगोकर, प्राचार्य दत्तात्रय गणगणे, सुरेशराव मेहरे, प्रकाशराव कुरळकर ,सुरेशराव अडगोकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. नंदा बनसोड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्मिता संजय घाटोळ, सौ.रजणी दीपक आमले, सौ. सुप्रिया गजभिये,सौ . कविता गवई,मधुकर आखरे दादाराव अंबाडकर यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.उज्ज्वलाताई मेहरे यांनी केले तर आभार कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे यांनी मानले .
कार्यक्रमाला सर्व शाखीय माळी समाज ऋणानुबंध परिवार,उपेक्षित समाज महासंघ, माळी समाज बचत गट, साईनगरचे पदाधिकारी तसेच स्व.दादासाहेब गवई चारीटेबल ट्रस्टचे पदाधिकारी व फुले – शाहू- आंबेडकर चळवळीतील अनेक समता सैनिकांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.कमलाकर पायस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री तुषार इवनाथे, राहुल तरोडकर, सुधाकर अंबादे, दादू सावरकर, पंकज सावरकर, प्रेम वानखडे यांनी अथक परिश्रम घेतले . कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here