Home लेख माजी आमदार नागो गाणार एक आदर्श व्यक्तीमत्त्व

माजी आमदार नागो गाणार एक आदर्श व्यक्तीमत्त्व

145

नागो पुंडलिक गाणार यांना मी गेल्या ३५ वर्षांपासून ओळखतो.अत्यंत साधं,सरळ व सालस व्यक्तीमत्त्व! सन १९९१— ९२ च्या काळात ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग सहकार्यवाह होते त्यानंतर कार्यालयमंञी होते.शिक्षक आमदार मी बनेल असा विचार कधीही त्यांच्या मनात आलेला नसेल याचे कारण असे की,पूर्वीपासून त्यांची परिस्थिती सामान्य व गरिबीची होती.
सुरूवातीला मी जेव्हा त्यांना बघितलं तर अंगावरती साधे कपडे,पायात स्लिपर चप्पल, सोबत एक जुनी सायकल की,जिच्या चाकावर वरचे कव्हर नव्हते. एवढं साधभोळं व्यक्तिमत्त्व!! त्यांच्या घरीही मी बरेचदा गेलो.केवळं दोन खोल्यांचं घर,त्यावेळेस घरासमोर वालकंपाऊंड देखील नाही.घरी कोणताही साहेबी थाट नाही.
परंतू शिक्षकांच्या प्रश्नावर नेहमी तळमळीने, पोटतिडकीने लढणारा हा माणूस! शिक्षणक्षेञाचा बारकाईने अभ्यास शासन निर्णय व परिपञके केव्हा निघाली ते दिनांकासह पाठांतर! शिक्षकांवर अन्याय,अत्याचार ज्यांनी केले त्या घटकांवर तुटून पडणारे वाघ!
ज्यांनी शिक्षकांवर अन्याय केला ते घटक कोणत्या धर्माचे आहे,कोणत्या जातीचे आहे,कोणत्या पक्षाचे आहे,कोणत्या विचाराचे आहे,याचा विचार त्यांनी जीवनात कधीही केला नाही.
संघटनेचे काम करताना कोणताही व्यक्तीगत स्वार्थ,लोभ ठेवला नाही.किमान गेली ४० वर्षे शिक्षणक्षेञासाठी अव्याहत सेवा देणारे एक निग्रही व्यक्तीमत्त्व!! काहीवेळा संघर्षात नोकरीही गमवावी लागली.तरीही न डगमगता त्यांनी शिक्षणक्षेञासाठी सदॆव लढा दिला.
आर्थिक परिस्थिती बेताची होती.त्यामुळे शिक्षक आमदाराचे त्यांनी संघटनेला कधीही तिकीट मागितले नाही.ते कधी यासाठी तयारही नव्हते.परंतू महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने त्यांचे प्रचंड कार्य पाहून त्यांना नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून तिकीट दिले.ते दोनदा शिक्षक आमदार म्हणून निवडून आले.मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.पराभवाचे नागो गाणार सरांना दु: ख नाही.परंतू त्यांच्यावर विश्वास असणार्या सर्व शिक्षकांना अजूनही त्याचे शल्य बोचते आहे.
शिक्षक आमदाराची संपूर्ण कारकीर्द केवळ शिक्षक व शिक्षण क्षेञासाठी त्यांनी खर्च केली.अहोराञ तेच चिंतन,तोच ध्यास!! शिक्षक हीच माझी जात, हाच माझा धर्म,हाच माझा पक्ष आणि हाच माझा विचार हेच त्यांचे ब्रीद!
नागो गाणार सर यांनी अनेक प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनप्रसंगी विधान परिषदेत मांडले.अनेक प्रश्नात यशही मिळविले.अनेक प्रश्नावर अजुनही आमदार नसतानादेखील त्यांचा पञव्यवहार व संघर्ष सुरूच आहे.पराभवाने निराश होवून लोक त्याकडे लक्षही देत नाही.परंतू ते सतत आताही संघर्ष करीत आहे.शिक्षण क्षेञातील भष्ट्राचाराची सर्व पाळेमुळे नष्ट करण्यासाठी डोळ्यात तेल घालून ते जागे आहेत.एवढेच नव्हे तर अन्यायी व्यवस्थेलाही ते झोपू देत नाही.
शिक्षकांचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे ” जुनी पेन्शन” या प्रश्नावर त्यांनी एवढे प्रयत्न केले की,त्यांनी स्वतःची आमदारकीची पेन्शनही नाकारली.त्यांचा हा कित्ता इतरांनी गिरविण्यासारखा आहे.
महत्त्वाचे म्हणजे गाणार सरांचे जीवन व्यसनमुक्त आहे.त्यांना कसलही व्यसन नाही.थाटबाटाचे राहणीमान नाही.कुठे देश,परदेशात काही स्थळे पाहण्यासाठी भटंकती नाही.आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात एक रूपयाचे मेडीकल बील स्वतःसाठी वा कुटुंबासाठीही उचलले नाही.एवढा मोठा त्याग त्यांचा आहे.तमाम शिक्षक बांधव व शिक्षण क्षेञासाठी नागो गाणार हे एक आदर्श व्यक्तीमत्त्व आहे! आज त्यांचा वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने दोन शब्द लिहिण्याची मला प्रेरणा झाली.त्यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा! शिक्षणक्षेञाच्या अखंड सेवेसाठी त्यांना दिर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना,जय शिक्षक परिषद!!
— राजेंद्र मोहितकर प्रसिद्धी प्रमुख,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा ग्रामीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here