Home महाराष्ट्र भीषण अपघात: बार्शी-कुर्डुवाडी रोड मृत्यूचा सापळाच बसखाली आली दुचाकी; १३ वर्षीय मुलीचा...

भीषण अपघात: बार्शी-कुर्डुवाडी रोड मृत्यूचा सापळाच बसखाली आली दुचाकी; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

415

दि.७
नागेश खुपसे-पाटील
(सोलापूर जिल्हा प्रतिनिधी)
बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात आज सकाळीं एक भीषण अपघात झाला. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील १३ वर्षीय लहान मुलगी (श्रावणी उबाळे ) जागीच ठार झाली, व गाडीवरील दोन तरुण रणजित उबाळे, संदीप उबाळे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे

दुचाकीचा क्रमांक MH45A P1891 असून ती थेट बसखाली गेली.मुलीचे आडनाव उबाळे असून ती चिचगाव गावची रहिवासी होती.या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली

घटनेनंतर लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.
जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात नेले गेले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here