Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून शैक्षणिक साहित्य वाटप !…

महात्मा फुले हायस्कूल येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवाराकडून शैक्षणिक साहित्य वाटप !…

239

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पापाशेठ वाघरे मित्रपरिवार यांच्याकडून शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एस व्ही आढावे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे माजी विद्यार्थी पापाशेठ वाघरे, संजय पचेरवार, सुजीत वाघरे, पत्रकार अविनाश बाविस्कर, सुरज वाघरे, रवी करोसिया, चेतन वाघरे, प्रल्हाद पचेरवार, सारंग वाघरे, सोनु लिडीया उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शाळेच्या वतीने सर्व प्रमुख अतिथींचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, १० डझन वह्या , २० चित्रकला वही, २० रंगपेटी, २० कंपास पेटी व २० पेन मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी सुरज वाघरे यांच्या जन्मदिनी शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस व्ही आढावे यांनी या स्थुत्य उपक्रमाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पी डी पाटील व आभार एच डी माळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here