Home चंद्रपूर चिमूरचा आठवडी बाजार नागरिकांच्या गैरसोयीचा व त्रासदायक

चिमूरचा आठवडी बाजार नागरिकांच्या गैरसोयीचा व त्रासदायक

350

 

 

चिमूर (प्रतिनिधी )- दर शुक्रवारी चिमूर येथील आठवडी बाजार मुख्य रस्त्याने भरत होता. परंतू हा गावातील सर्व नागरिकांच्या सोयीचा होता. स्ञिया एकट्या जावून घरी बाजार घेवून येत असे. परंतू बाजाराचे दिवशी रस्ता एकेरी सुरू राहत होता. यामुळे वाहतुकीची समस्या व अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे हा आठवडी बाजार इतरत्र दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचे ठरविले.

दर शुक्रवारचा आठवडी बाजार हा लोणकर यांच्या जागेवर पेट्रोल पंपचे मागे नेण्यात आला. हा बाजार गावातील नागरिकांना खूप लांब पडतो. एकटी महिला पायदळ जावून वजनदार पिशवी आणू शकत नाही. दुचाकी वाहनाने दोन व्यक्तीस बाजाराला जावे लागते किंवा अॅटोने बाजारात जाणेयेणे करावे लागते. जाण्यायेण्यातच पन्नास रूपये खर्च होतात. नवीन बाजार हा चिमूर गावापासून दोन ते तीन किलोमीटर पडतो. वडाळा व गावातील इतर वार्डास खूप लांब पडतो. तसेच खेडे गावावरील लोकांनाही खूप दुर पडतो.

चिमूरच्या नागरिकांच्या सोयीने दोन बाजार भरविण्यात यावे अशी जनतेतून विशेषतः महिला वर्गातून मागणी होत आहे.
चिमूर येथील चावडी वार्ड याठिकाणी पूर्वी पोळ्याच्या महिण्यात बाजार भरत होता. या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. ही जागा बाजाराचेदृष्टीने सोयीची आहे.
आता नवीन लोणकर यांचे जागेवरील बाजारात ओटे व सभोवताली भिंत व नाली आहे नागरिकांना नालीवरून वर चढावे लागत होते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. बाजाराला क्रांती नगरच्या फलकाजवळून एकच रस्ता असल्याने खूप गर्दी असते.

या बाजारात दुकाने अस्ताव्यस्त आहेत. भाजीपाल्याची दुकाने तर कुठेही लावण्यात येतात. फळे, धान्य व इतर वस्तूंची दुकाने एका रांगेत असायला हवी होती परंतू दुकाने अस्ताव्यस्त लावली जातात, त्यामुळे नागरिकांना ञास होतो.

जनतेची गैरसोय व त्रास लक्षात घेता चिमूर येथे दोन आठवडी बाजार भरविण्यात यावे व जनतेची गैरसोय व त्रास दुर करावा. विशेषत: महिला वर्गास या बाजाराचा खूप ञास होत आहे, तो दुर करण्यात यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here