Home गडचिरोली गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांची मुलचेरा तालुक्यात आढावा...

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांची मुलचेरा तालुक्यात आढावा बैठक

243

 

 

मुलचेरा–गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुलचेरा तालुक्याच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. विकासकामांतील अडथळे, नागरिकांच्या अडचणी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार, नायब तहसीलदार लोमेश उसेंडी, गटविकास अधिकारी एल. जुवारे, माजी जि.प. सदस्य रवींद्र शहा, आदिवासी सेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी, मुलचेरा तालुकाध्यक्ष प्रमोद गोटेवार, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अहेरी तालुकाध्यक्ष डॉ. निसार हकीम, ग्रामपंचायत सदस्य श्री. शुभम शेंडे आणि अन्य पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा, ग्रामविकास कामे, पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरावस्था, रोजगार हमी योजनेतील त्रुटी, वनहक्क कायद्याचे प्रलंबित प्रकरणे, शासकीय योजनांचा लाभ अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
खासदार डॉ. किरसान यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, विकासकामांना गती द्यावी आणि प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे. “मी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सोबत आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
बैठकीच्या शेवटी सर्व मान्यवरांनी एकत्र येत सहकार्याच्या भावनेतून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here