



नेरी प्रतिनिधी,-चिमुर तालुक्यातील नेरी येथील व.राष्ट्रसंत तुकडोजी शिक्षण संस्था नेरी द्वारा संचालित स्व.दागोजी पिसे कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा नेरी मधुन ९१.५९ टक्के निकाल लागला असुन उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे
नुकताच येथे HSC बोर्ड परिक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल येऊन प्राप्त झाला आहे
यामध्ये स्मीत अविनाश नवले ७६ टक्के गुण घेऊन शाळेतुन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे
तर ओम शंकर शेरकी याने ६८.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे
सौरभ दिलीप सोनघरे याने ६७.५० टक्के गुण घेऊन तीसरे स्थान पटकावले आहे , अनुष्का संजय धकाते हिला ६७.५० टक्के गुण घेऊन शाळेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे महेश मोहन नागपुरे याला ६६ टक्के गुण मिळविले असून भावना भरत भेंडारे हिने ६१.८३ तर रानु प्रकाश पिंपडकर हिने ६१.८३ टक्के मिळविले आहे
यावर्षी नेरी मध्ये सर्वाधिक निकाल स्वर्गीय दागोजी पिसे अध्यापक विद्यालयाचा ९१.५९ टक्के लागला असुन शैक्षणिक क्षेत्रात मध्ये
मानाचा तुरा रोवला गेला असुन स्वर्गीय दा.ग.पिसे अध्यापक विद्यालयाने नाव लौकीक केला आहे
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश दा. पिसे, पदाधिकारी व मुख्याध्यापक शिक्षक यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.














