Home चंद्रपूर शिक्षणातूनच आयुष्य घडवा.. केशवराव ठाकरे. पिंपळगाव शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

शिक्षणातूनच आयुष्य घडवा.. केशवराव ठाकरे. पिंपळगाव शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

625

 

राजुरा–
शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार आहे. कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका. उत्तुंग ध्येय ठेवा आणि ते प्राप्त करण्यासाठी सातत्याने परिश्रम करण्याची तयारी ठेवा .शिक्षणातूनच आयुष्य घडवा असे प्रतिपादन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे यांनी पिंपळगाव येथील आदर्श शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना व्यक्त केले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगाव येथे शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. याप्रसंगी केशवराव ठाकरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेचे माजी विद्यार्थी व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,जिल्हा चंद्रपूर चे माजी जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे यांच्या ओंकार नवचैतन्य शिक्षण मंडळ, पिंपळगाव यांच्या वतीने उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी कु. वेदिका शंकर शेंडे, कु. संस्कृती देवनाथ गोहोकार व कु. दीप्ती मुरलीधर गुरनुले या विद्यार्थिनींना त्यांच्या वर्षभरातील अभ्यास, उपक्रमातील सहभाग व एकूणच शैक्षणिक प्रगतीच्या आधारे गौरविण्यात आले. या विद्यार्थिनींनी शाळेच्या सर्वच उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेतल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,जिल्हा चंद्रपूर चे जिल्हा उपाध्यक्ष आनंद चलाख उपस्थित होते.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. बंडु बोढाले, उपाध्यक्ष देवणाथ गोहोकार, तसेच विकास धूर्वे, आनंदराव गोहणे, वामन गानफडे, मुरलीधर गुरनुले,बापूराव पोटे, मारोती डवरे, दिलीप केळझरकर, गणेश लोंनबले,मडावी सर,आकनूरवार सर,गावंडे सर,झाडे मडम,चटप मडम आदी मान्यवर उपस्थित होते. आंगणवाडी सेविका वाढई ताई, लोंनबले ताई, नागपुरे ताई आणि आशा वर्कर देशमुख ताई यांचाही कार्यक्रमात सहभाग होता.
याप्रसंगी प्रमुख अतिथी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आनंद चलाख व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू बोढाले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक अशोक गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विषय शिक्षक विजय आकनुरवार, कू. रेखा झाडे, सौ. मंगला चटप व श्री. निलेश मडावी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here