


अमरावती (प्रतिनिधी)
” बडनेरा रोडवरील ड्रीम प्राईड येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते वामनराव मालखेडे हे एक आदर्श
व्यक्तिमत्त्व होते.सुसंस्कारातून त्यांनी स्वतःच्या मुला मुलींना तर घडवलेच शिवाय सामाजिक बांधिलकीतून त्यांनी जे कार्य केले ते महत्त्वपूर्ण आहे. करजगाव बहिरम येथील मुळचे रहिवासी असलेले वामनराव त्यांच्या सुस्वभावामुळे सर्वांना परिचित होते.” असे विचार प्रा. अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले .
ते सामाजिक कार्यकर्ते वामनराव शामरावजी मालखेडे यांना दि.३ मार्च २०२५ ला हिंदू स्मशानभूमी येथे दिलेल्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात बोलत केले.
वामनराव मालखेडे यांचे दि.२ एप्रिल २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते ७४ वर्षाचे होते.त्यांचा अंत्यविधी दि.३/४/२०२५ रोज गुरुवारी हिंदू स्मशानभूमी अमरावती येथे शोकाकूल वातावरणात संपन्न झाला.त्यांच्या मागे त्यांची पत्नी सत्यभामा,मुलगा डॉ.स्वप्नील, मुलगी सौ.वैशाली विनोदराव रेवसे,नातवंड आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
हिंदू स्मशानभूमी अमरावती येथे पार पडलेल्या शोकसभेचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक पांडुरंगजी खंडारे होते.
याप्रसंगी कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,चर्मकार महासंघ,अमरावती जिल्हा अध्यक्ष निलेश जामठे,
प्रा.श्रीकृष्ण इंगळे, रुपरावजी इंगळे,नंदकिशोर राठी, सचिव,ड्रीम्स प्राइड निवासी संस्था अमरावती,रघुनाथजी धुमाळे,चंदूभाऊ काळे,आरोग्य विभाग,नांदगाव खंडेश्वर,इंजि. श्री शामभाऊ साळुंखे आंबेजोगाई,गजाननराव इंगळे यांनी श्रद्धांजलीपर भाषणे दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. किशोर चापके यांनी
केले. याप्रसंगी बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.













