


चीन , रशिया, उत्तर कोरिया येथे एकपक्षीय राजकारण आणि एकपक्षीय सत्ता आहे.तशी तरतूद त्यांनी करून घेतली.फक्त कम्युनिस्ट पार्टी चा उमेदवार उभा राहिल.मतदारांनी हो किंवा नाही असे मत द्यायचे.काहीही मत दिले तरीही तोच उमेदवार विजयी घोषित होतो.त्यामुळे नाही मताला काहीच किंमत नाही.असा अनुभव आल्यामुळे नाही मतदार सुद्धा हो मत देऊन मोकळे होतात.
अशीच पद्धत भारतात राबवली जाते.कितीही पक्ष आणि कितीही उमेदवार असले तरीही मतदारांचे मत भाजपलाच जाणार अशी तरतूद केल्यामुळे भाजपचाच उमेदवार विजयी होतो.म्हणून इतर पक्षांच्या किंवा अपक्ष उमेदवाराला मतदान केले तर ते जर भाजपला जात असेल तर आपणच सरळ भाजप ला मतदान केले तर जास्त सोयीचे वाटते.पुणे ते फलटण एसटी बस मधे डांबून बलात्कार करणारच आहे तर विरोध तरी का करावा? बलात्कार करणारच आहे तर एकदा काय आणि दोनदा काय?काय फरक पडतो?अशी हतबलता भारतीय मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.
मतदार म्हणतो.”तुम्ही खूप चांगले उमेदवार आहात पण माझ्या मतांनी निवडून येणारच नाही तर मग मी माझे मत तुम्हाला देऊन वाया का घालवावे?असे मतदार जळगाव शहरात आहेत.”जे इव्हीएम करणार आहे तेच मी केले तर काय वाईट?”
हे शब्द घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कानावर पडले असते तर ,किती दुःख झाले असते!”आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू शकत नाही तर मग निवडून येणाऱ्या उमेदवारांशी सौदा करून घेतला तर बिघडले कुठे?तितकेच त्यांचे आणि आपले संबंध टिकून राहातील.आपल्या समाजासाठी निधी मागून घेता येईल.”
असा विचार करणारा मतदार पुर्णतः जबाबदार नाही.कारण त्याला विरोधी पक्ष कांग्रेस मधे आशेचा किरण दिसत नाही.एक पंचवार्षिक,दोन पंचवार्षिक,तिसरी पंचवार्षिक जर एकच पक्ष सत्तेवर येत असेल तर आम्ही किती वेळ विरोधात तग धरावे?विरोधात तसा कोणताही राष्ट्रीय पक्ष दिसत नसेल तर किती काळ वाट पाहावी?असा विचार क्षणिक सुखाचा ,तत्काल लाभाचा विचार करणारे मतदार करतात.तरीही घटनेचा उदोउदो करतात.”भारतीय संविधानाचा विजय असो!”कसे शक्य आहे?संविधानाचा पराजय करणाऱ्यांच्या पंक्तीत जेवून घेतले तर संविधानाचा विजय कसा शक्य आहे?
ही भयंकर निराशाजनक ,हतबल अवस्था आज भारतात बनलेली आहे.हे नैराश्य,ही हतबलता घालवण्यासाठी आज तरी कांग्रेस कडे कोणतेही धोरण नाही, भुमिका नाही,अजेंडा नाही.जे भाजपपेक्षा चांगले वाटतील.पानिपतचे युद्ध हारल्यानंतर मराठ्यांनी फुटीरतावादी लोकांचा बदला घेतला होता.सूड उगवला होता.पण तितकेही बळ कांग्रेस मधे उरलेले दिसत नाही.कांग्रेस म्हातारी झाली आहे.कितीही वेळा लग्न केले तरीही संतती होत नाही.कितीही अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष बदलले तरीही उमेद येत नाही.
मी आतापर्यंत महाराष्ट्राचे चार प्रदेश अध्यक्षांना समक्ष जाऊन भेटलो.एकालाही ती चिंता नाही.एकामधेही ती उर्मी आढळली नाही.राहुल गांधींना सुद्धा भेटणारच आहे.जर ते मतदारांना आपले समजत असतील तर!
✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२














