Home महाराष्ट्र धरणगाव येथे ‘संविधान सन्मान परिषदेची’ बैठक उत्साहात संपन्न !

धरणगाव येथे ‘संविधान सन्मान परिषदेची’ बैठक उत्साहात संपन्न !

197

▪️राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे साक्षीदार व्हावे;प्रा.डॉ.भरत शिरसाठ

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)

धरणगांव(दि.14मार्च):-धरणगाव येथील गौतमनगर समाज सभागृहात राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची बैठक उत्साहात संपन्न झाली. प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी केले. तत्पूर्वी भ.गौतम बुद्ध, छ.शिवाजी महाराज, राष्ट्रपिता जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई, राजर्षी शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. याप्रसंगी पूज्य भदंत अमर ज्योती, भैय्यासाहेब सोनवणे यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल यांनी तर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे मुख्य संयोजक प्रा.डॉ.भरत शिरसाठ व चिंतामण जाधव यांचा माजी उपनगराध्यक्ष दिपकराव वाघमारे यांच्या हस्ते ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

        राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे मुख्य संयोजक आप्पासाहेब भरत शिरसाठ यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन करून एक दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. येत्या रविवारी १६ मार्च, २०२५ रोजी ” संविधान नगरी कृष्णा हॉटेल मैदान ” एरंडोल येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद संपन्न होत असल्याने शहर परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रिडा क्षेत्रातील तसेच सर्व संविधान प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे मुख्य संयोजक प्रा.भरत शिरसाठ यांनी केले आहे.

याप्रसंगी उषाताई बाविस्कर, बबिताताई बागुल, बेबीताई गायकवाड, सविता गाढे, अजय सोनवणे, विक्रम वाघमारे, संतोष सोनवणे, मयूर भामरे, उदय मोरे, बबलू शिरसाठ, चंदू सोनवणे, अशोक मोरे, किरण सोनवणे, संकेत शिरसाठ, विजय गायकवाड, भुंडा पहिलवान, विवेक बाविस्कर, संविधान सन्मान परिषदेचे संयोजक सुधाकर मोरे, कैलास पवार, लक्ष्मण पाटील, हेमंत माळी, प्रा.आकाश बिवाल, बी डी शिरसाठ, सत्यशोधक शिवदास महाजन, गोरख देशमुख, निलेश पवार, सुरज वाघरे, ॲड.रविंद्र गजरे, प्रदिप बाविस्कर, दिपक विजय वाघमारे, विजय सोनवणे, महेंद्र तायडे, उदय मोरे, आबासाहेब राजेंद्र वाघ तसेच सर्व संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र बागुल यांनी तर आभार राजेश बोरसे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here