


✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.3मार्च):- राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे केंद्रीय सदस्य असलेले आणि गोंडपिपरी तालुका ग्रामगीता जीवन विकास परीक्षा समितीचे तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत श्री.सुभाष दत्तुजी पावडे यांना सानेगुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाला आहे,त्यांचे जन्मगाव राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन असून त्यांचे पुढाकारातून सिंधी येथील शाळेला स्वच्छ-सुंदर शाळा पुरस्कार त्यानंतर कोहपरा येथील शाळेला मॉडेल स्कुल-चेतणा शाळा म्हणून सन्मान मिळवला,गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी येथील जि.प.शाळेवर ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून 2023-24 वर्षी “उत्कृष्ठ शाळा” म्हणून मा.विवेक जान्सन मुख्यकार्यपालण अधिकारी जि.प.चंद्रपूर यांचे हस्ते त्यांचा विशेष सन्मान झालेला आहे.
त्यांनी 1998 पासून विरुर येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा सक्रिय सदस्य म्हणून काम केलेले आहे,त्यांचे विशेष कार्याची दखल घेवून त्यांना यावर्षी दि. 6 व 7 मार्च 2025 रोजी सांगडी मंडल-बेला जि.आदिलाबाद येथे होणाऱ्या आंतरराज्यीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात सानेगुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व मानवस्त्र,रोख रक्कम असे आहे,त्यांचे निवडीबद्दल प्रभाकर नवघरे स्वागताध्यक्ष,ॲड.राजेंद्र जेनेकर, डॉ.श्रावण बानासुरे,लटारु मत्ते,ॲड.सारीका हिरादेवे,सुनिता पावडे,ज्ञानेश्वर मोरे,विश्वास सूर,सुरेंद्र चोथले,बाबाजी लेडांंगे,शंकर धाबेकर केंद्रप्रमुख,विठ्ठल गोंडे,सचिन बावणे अध्यक्ष अखिल म.शिक्षक संघ,कु.पिकी पिटर मँडम,कु.शैला भोगेकर मॅडम,प्रेम खोब्रागडे,अनिषा पावडे,राजकूमार चिंचोळकर,महेश अल्लेटीवार,प्रमोद उरकुडे,ओम पावडे,विनोद ढोबे,देवानंद ढुमणे,जुनघरे केंद्रप्रमुख, मनोहर बोबडे, रत्नाकर नक्कावार,सुरेश बोंडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.















