


भाजप सत्तेवर आल्यापासून आर्थिक व्यवसाय करणाऱ्या नेत्यांना इडीची बेडी घालण्याचा सपाटा लावला. आम्ही त्यांचे स्वागत करतो. चोरांना बेडी लावलीच पाहिजे.कारण राजकारण आणि आर्थिक व्यवसाय हे समीकरण जास्त मजबूत झाले होते. आजही आहे. भाजप नेत्यांचेही असेच आर्थिक व्यवसाय आहेत. पण त्यांना इडीच्या कारवाई पासून सूट आहे.कारवाई चांगलीच आहे पण त्यात सुट दिली ते चुकीचे आहे. त्यामुळे भाजप आणि मोदी बदनाम झाले आहेत.
ज्याला इडीने नोटीस दिली किंवा कारवाई झाली आणि तो भाजपात गेला कि त्यावर इडीची कारवाई थांबते.थांबवली जाते. हा दोष मोदींना लागतोच. या पापातून मोदींची सुटका नाही. जरी ते रोज गंगेत आंघोळ करीत असले तरीही नाही.असा दुजा भाव करण्याचे पाप मोदींना कधीच क्षमा करणार नाही. ना पृथ्वीवर,ना स्वर्गात, ना पाताळात.दस्तुरखुद गंगा पुत्र भिष्म यांची या पापातून सुटका झाली नाही. जैसा करम करेगा वैसा फल देगा भगवान!
इडीच्या एकतर्फी कारवाई मुळे कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आप असे पक्ष बदनाम आणि बरबाद झाले. कारण हेच. राजकीय पदाचा गैरफायदा घेऊन उलटे सुलटे धंदे करणे.
भाजप पक्ष आता भाजप नेत्यांचा राहिलेला नाही. त्यात साठ टक्के नेते कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आप मधून आले आहेत. हे पक्षांतर नसून चोरांनी घेतलेला सत्ताश्रय आहे. भाजपचे धोरण आवडले म्हणून भाजपात गेलो, असा एकही आमदार खासदार नाही. जेलमधे जाण्यापेक्षा भाजपात गेलेले काय वाईट.यामुळेच भाजप हे चोरांचे डंपींग ग्राउंड झालेले आहे. इतर पक्षातील घाण गटारीतून वाहात येत भाजपात जमा झाली आहे.
राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल याच ड्रेनेज मुळे परेशान झालेले आहेत.पण हे नेते असे ड्रेनेज थांबवू शकले नाहीत.डॅमेज कंट्रोल करू शकलेले नाहीत.जसे उताराकडे वाहाणारे पाणी अडवता येत नाही.पापींचे अधःपतन होणारच.
आर्थिक हेराफेरी, अफरातफरी, आर्थिक गुन्हेगारी वर इडी कारवाई करते. तर या आजारावर उपचार होत नसेल तर प्रतिबंधक उपाय करणे हाच एक पर्याय आहे.तो उपाय गांधी विचारांचा आहे. चोरी करायची नाही, धन संकलन करायचे नाही म्हणून कपड्यांना खिसाच ठेवला नाही. शस्राचा वापर केला तर हिंसा होते म्हणून शस्त्र ठेवले नाही.शाळा, कॉलेज, पतपेढी, कारखाना, दवाखाना चालवला नाही.कोणताही मंदिर ट्रस्ट काढला नाही.अशा व्यक्तीला जर जेलमध्ये ठेवले तर जनता चूप बसणार नाही.तसा प्रयत्न इंग्रजांनी केला. पण परिणाम उलटा झाला. शांतताऐवजी उद्रेक वाढला.
असा उद्रेक भुजबळ,संजय राऊत, अनिल देशमुख, नबाब मलिक, केजरीवाल, सिसोदिया, संजयसींग, भारती, जैन यांच्या अटकेनंतर झाला नाही. जनतेमधे चीड निर्माण झाली नाही. जर सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना असे कोणतेही कारण दाखवून जेलमध्ये टाकले तर मोदींना भारत नियंत्रणात आणता येणार नाही. ही जाणिव मोदी आणि शहा कंपनीला आहे. तशी चूक ते करणारच नाहीत.
भाजप आज रोजी सर्वाधिक मोठा पक्ष आहे. त्यांचे सदस्य इंग्लंड अमेरिकेत नव्हे तर चंद्र आणि मंगळावर सुद्धा आहेत. इतर पक्षांना प्रश्न पडला आहे. हू वील बेल द बुल?मी म्हणतो, गांधीजी वील बेल द बुल. सज्जन, प्रामाणिक माणसेच माजोरी बैलाला, हत्तीला लगाम लावू शकतात. आम्ही पुस्तकात वाचले होते, महावीरांनी उधळलेल्या हत्तीला शांत केले होते. गांधीजींनी इंग्रजांना हतबल केले होते. कोणते शस्त्र होते?सत्य, अहिंसा, त्याग, असंग्रह.
✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२














