Home महाराष्ट्र ग्राम सुरक्षा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुसेगाव येथे 18 रोजी बैठक

ग्राम सुरक्षा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुसेगाव येथे 18 रोजी बैठक

217

✒️सातारा, खटाव(प्रतिनिधी,नितीन राजे)मो:-9822800812

पुसेगाव(दि.17फेब्रुवारी):-तालुका खटाव जिल्हा सातारा येथील पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामस्थांना मा. पोलीस अधीक्षक सो सातारा व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, यांचे आदेशानुसार किरकोळ तक्रारीवर देखील ताबडतोब तोडगा काढून वाद ताबडतोब मिटावा यासाठी *ग्रामसुरक्षा योजनेची* प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी दिली.

                           जिल्ह्यातील मालमत्ते संदर्भात व शरीराविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालणे करीता सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्रभावी रित्या ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरी,दरोडा, आग, जळीताच्या घटना, लहान मुले हरवणे, शेतातील पिकांची चोरी,गंभीर अपघात, वन्य प्राणी हल्ला,पूर,भूकंप इत्यादी घटनांमध्ये सर्व गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलास ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे मोठी मदत होत आहे. तसेच जिल्हा प्रशासनास माहिती प्रशासनाचे काम जलद गतीने करण्यास ग्रामसुरक्षा यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.

आपत्कालीन परिस्थितीत, संकटात स्वतःचे मोबाईल वरून सर्व गावकऱ्यांना एकाच वेळी सूचना देणे, सावध करणे यासाठी उपयुक्त ग्राम सुरक्षा यंत्रणा संकटकाळी घाबरू नका, ग्रामसुरक्षा यंत्रणेला फोन करा, संकटकाळी मदतीला जा याबाबत सर्वांना या यंत्रणेचा उपयोग व्हावा व त्वरित मदत मिळावी या उद्देशाने व सदरची ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यासाठी व त्याबाबत माहिती देणे करता **मंगळवार दिनांक १८/०२/२०२५ रोजी दुपारी ०४.०० वाजता श्री सेवागिरी मंगल कार्यालय दहिवडी रोड पुसेगाव ता. खटाव जि. सातारा* या ठिकाणी मिटिंग आयोजित केली आहे. सदर मिटिंग करिता मा तहसिलदार साहेब खटाव या स्वतः हजर राहणार आहेत. तरी पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य सामाजिक कार्यकर्ते, गावातील प्रमुख मंडळी, अंगणवाडी सेविका, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व ग्रामसेवक, सर्व तलाठी, सर्व पोलीस पाटील, पत्रकार बंधू-भगिनी यांचे करिता मिटींगचे आयोजन केलेले आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन पुसेगाव पोलीस स्टेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here