Home राजकारण देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून आणलेल्याच कामांचे श्रेय विद्यमान आमदारांनी घेऊ नये...

देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून आणलेल्याच कामांचे श्रेय विद्यमान आमदारांनी घेऊ नये — अंकूश घारड

265

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांच्या कर्यकाळामध्ये मंजूर झालेल्या विकासकामांचे फलक लाऊन उद्घाटन करण्याचा सपाटा आमदार चंदू यावलकर यांनी सुरू केला असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अंकुश घारड यांनी विद्यमान आमदारांना आधी विकासकामे मंजूर करून आणावे व त्यांनी त्याच कामांचे भूमिपूजन करून श्रेय घ्यावे असा सल्ला आमदार चंदू यावलकर यांना दिला आहे.
मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये विकास पुरुष माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी 4 हजार 372 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेल्या विविध विकासकामांवर काही विरोधक स्वत: जाऊन त्या कामाच्या ठिकाणी उभे राहून फोटो काढून सोशल मीडियावर टाकत आहेत. म्हणजे काम देवेंद्र भुयार यांनी केले अन् श्रेय विरोधक लाटतात. यापेक्षा त्यांनी स्वतः विकासकामे मंजूर करून आणावे व त्याच कामांचे त्यांनी बॅनर लाऊन उद्घाटन करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अंकुश घारड व त्यांच्या समर्थकांना केले आहे.
सध्या मोर्शी तालुक्यात विविध विकासकामांचे उदघाटन आमदार चंदू यावलकर यांच्या हस्ते होत आहे. ही विकासकामे आम्ही मंजूर केल्याचे सोशल मीडियावर विद्यमान आमदार यांचे समर्थक प्रचार करत असल्याने अंकुश घारड यांनी ही माहिती दिली.
तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांनी ऑगस्टमध्ये जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मोर्शी शहरातील विविध विकास कामासाठी ४ कोटी ८७ लक्ष रुपये निधी मंजूर केला होता आणि सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागली विकास कामे निविदा प्रक्रियेत थांबली निवडणुकी नंतर सर्व कामांची प्रकिया पार पडली आणि त्याचे श्रेय आता विद्यमान आमदार चंदू यावलकर व त्यांचे समर्थक घेत आहे यावलकर साहेबांना एकच कडकडीची विनंती आहे की त्यांनी उदघाटनाची टीकास् मारतांना त्या जागेवर तिथल्या लोकांना प्रशासकीय मान्यता किती तारखेची आहे ते किती तारखेला आमदार झाले याचे स्पष्टीकरण द्यावे व स्पष्टीकरनाचे व्हिडीओ त्यांच्याच फेसबुकवर आणि इंस्टाग्राम वर म्हणजे सोशल मीडियावर जाहीर करावे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल जेणेकरून ज्या लोकांनी आमदार महोदयांना मतदान केले आहे त्यांना त्याची चुकीची जाणीव निश्चितच होऊन जाईल
असा टोला अंकूश घारड यांनी लगावला असून आ. चंदू यावलकर यांना आता मंत्रालयात 5 वर्षे कागदांचा पाठपुरावा करायची गरज नाही कारण माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर केलेल्या विकास कामाचे उद्धघटन आ. चंदू यावलकर यांनी 5 वर्षे टिकास मारत फक्त उदघाटन / लोकर्पणच करावे लागणार असल्याने जनतेला सत्य कळू द्या असा सल्ला अंकुश घारड यांनी विद्यमान आमदार चंदू यावलकर व त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. कारण माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघात सकारात्मक काम केले. त्यामुळेच हजारो कोटी रूपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत. मतदारसंघात देवेंद्र भुयार यांनी प्रामाणिक काम केले म्हणूनच मोर्शी वरूड तालुका विकासात अग्रेसर असल्याचे चित्र दिसत असल्याचे अंकुश घारड यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here