Home लेख संस्कार बाकी आहे!

संस्कार बाकी आहे!

179

 

मुलांना गुरा ढोरांसारखे वाढवले. दुसरीकडे संपत्ती ढोर मेहनतीने वाढवली. तर ती गुरे ढोरे त्या संपत्ती वर तुटून पडतात. रखवालदाराला नष्ट करून. जो आजोबा होता.

अशी अनेक माणसे आहेत ते अक्कल हुशारी ने किंवा डावपेच करून कमवतात. पण त्यांना प्रश्न कधीच पडत नाही कि, हे कोणासाठी? जे उपभोग घेण्यास पात्र नाहीत, त्यांचे साठी!

असा प्रकार नोकरवर्गात जास्त आहे. आधिकतम पोलिस, महसूल, आरटीओ, एक्साईजमधे. हे नोकर नागरिकांचे शोषण करतात. अतिरिक्त पैसा मिळाला कि राक्षसा सारखे मजा मारतात. असे राक्षस मुलांवर संस्कार करू शकत नाहीत. तितका वेळ तर नसतोच पण लुटमार करण्यात ती सुबुद्धी सुचतच नाही. कि मी ही लुटमार करतो कोणासाठी? जर एका नोकराने जर दहा नागरिकांना लुटले असेल तर त्याला बायकोने, मुलाने, सुनेने, नातूने किंवा कामवालीने लुटले तर काय बिघडले? असे अनेक नोकरवर्गाचे खून घरातीलच सदस्यांनीच केले आहेत. काही उघड झाले, काही नाही झाले.
जळगावला तर असाच खून डीवायएसपीचा झाला होता. दुसऱ्या पत्नीने केला होता बिहारी मारेकरी भाड्याने घेऊन. अशीच आत्महत्या एका पोलिस निरीक्षकाने केली होती. दोन बायकांच्या छळाला कंटाळून. रेतीचे हप्ते देऊ कोणाला? अशी मालिका चालू असते. जर त्या मालिकेतील कलाकार तितके निपुण असतील तर.
जळगाव मधे असे अनेक जेष्ठ नागरिक आहेत. ज्यांनी गैरमार्गाने संपत्ती संकलीत केली. मुले मोठी झाली. पण हे दरदर भटकत आहेत. कारण मुलांवर संस्कार केले नाहीत. जे झाले ते लुटमारीचेच. बाप लुटतो तर बायको आणि मुलांना कळतेच. हा कुठे, कोणाची, कशी मुंडी मोडतो? तर मग, लुटा त्यालाही.अशी भावना आपोआप बनते.बापाची वृत्ती ती मुलांची प्रवृत्ती बनते.
अनेक शेतकरी, कामकरी, व्यापारी असेच भरभक्कम कर्ज काढून घेतात. मुद्दाम बुडवण्याच्या हेतूने. ते फेडायचे नाही म्हणून. मग, नियोजनबद्ध आत्महत्या करतात. ती आत्महत्या कर्ज फिटत नाही म्हणून नव्हे, तर फेडायचे नाही म्हणून असते.
रावणाने असाच हव्यासापोटी दहा देश जिंकले. सोन्याची लंका मढवली. पण पुढे काय? मुलगा,भाऊ,मामा सर्वच त्यात मत्यांध झाले होते. कोणाचेही ऐकायला तयार नाहीत. शेवट तर वाईट होणारच. तोच प्रकार औरंगजेबने केला. भाऊ मारले. बापाला कैदेत टाकले. मुसलमान सुद्धा वैतागले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन मिळाले. म्हणे, महाराज संपवा याला.
आता अनेक आमदार खासदार मंत्री जनतेच्या कराचा पैसा लूटत आहेत. यांची मती वाईट आहे. यांची गती वाईट आहे. शेवट सुद्धा वाईट होणार.
कुटुंबातील कलह बाबत सरकार जास्त हस्तक्षेप करीत नाही. फक्त खून वगैरे पुरते लक्ष देते. शेवटी संसार तर आपला आहे तर संस्कार सुद्धा आपलेच असले पाहिजे. आपल्या मुलांवर दुसरा तिसरा कोणी संस्कार करील, या भ्रमात कोणीही राहू नये. ती आपलीच जबाबदारी असते.
संस्कार म्हणजे सकाळी सकाळी शुभम करोती म्हणणे नव्हे. टिळा लावून दगडाच्या मुर्ती समोर घंटा वाजवणे नव्हे.चंबळच्या डाकू सारखा टिळा लावून मिरवणे नव्हे.ते थोतांड असते.आधी देवाला मुर्ख बनवणे नंतर माणसांना मुर्ख बनवणे.हे नाटक बायको, मुले, नातवंडे पाहातात.तसा संस्कार त्यांचेवर आपोआप होतो. संस्कार म्हणजे बापाने दिवस रात्र केलेल्या व्यवहाराचा मुलांवर झालेला परिणाम असतो.
संस्कार शब्दांनी होत नाही.संस्कार तिर्थ यात्रा करून होत नाही.संस्कार मुर्ती, ढोल वाजवून होत नाही. संस्कार होतात आपल्या कर्मामुळे.व्यवहाराचे दृष्य फळ म्हणजे धन.व्यवहाराचे अदृश्य फळ म्हणजे संस्कार. धन घरात संचित होते. संस्कार देहात संचित होतात. मुर्ख माणसे धन मोजतात. बुद्धीमान माणसे संस्कार मोजतात.
एका माणसाने खूप पैसा खर्च करून बंगला बांधला. वाटसरू वर मान करुन पाहात. थांबत.
व्वा! किती सुंदर बंगला आहे!
मालकाने बोलवले. गप्पा मारल्या. दगड कोठून आणला? सिमेंट कोठून आणले? फरशी कोठून आणली? कारागिर कोठून आणले?
मालकाने विचारले. कसा काय वाटतो, माझा बंगला?
वाटसरू म्हणाला, तसा काही खास नाही.
मालकाने प्रश्न केला, काय कमी आहे?
म्हणे, यावर संस्कार झाले नाहीत.
अरेच्चा! कसे काय? ही काय भानगड असते?
अहो, आम्ही एक तासांपासून गप्पा मारत आहोत. वहिनी, मुले, सुनबाई उभे आहेत. कोणालाही वाटले नाही कि, यांना पाणी तरी द्यावे. हा संस्कार बाकी आहे.
एकदा एक माणूस भेटला.नांव विचारले. म्हणे मी राम आहे.
अहो देवा, तुम्ही तर आता अयोध्येच्या मंदिरात असायला हवे होते.
नाही रे वेड्या! देव कुठे मंदिरात थांबतो का? जर मी मंदिरात थांबलो तर जे भक्त अयोध्या येऊ शकत नाहीत, त्यांना कसा भेटणार?
अहो देवा! मी तर आता अयोध्येला जायला निघालो.आणि तुम्ही इकडे कसे?
तू आधी गाडीत बस. अयोध्या जाऊन माझे मंदिर पाहून ये. मी माझा भक्त पाहून येतो.

शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
मो. ९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here