Home महाराष्ट्र अंधश्रद्धा टाळा, डोकं चालवा-श्री. शिवाजी बोत्रे  

अंधश्रद्धा टाळा, डोकं चालवा-श्री. शिवाजी बोत्रे  

259

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.6फेब्रुवारी):-अंधश्रद्धा म्हणजे विज्ञानाच्या पलीकडील अलौकिक आणि चमत्कारी शक्तीच्या सहाय्याने आपण मानवी जीवनात अपेक्षीत बदल घडवून आणल्या जाऊ शकतो, यावर विश्वास असणे. देव, भूत, प्रेत अंगात येणे आणि मांत्रिक आपल्या मंत्रशक्तीद्वारे ते दुर करू शकतो असे मानणारे अंधश्रद्धेच्या जाळात सापटलेले तर्क आणि सद्सदविवेकबुद्धीविहिन अंधश्रद्धाळू अपल्याकडे कमी नाहीत.” असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे मा. श्री. शिवाजी बोत्रे यांनी केले. ते मौजे किवळ येथे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजेनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर बोलत होते तसेच त्यांनी अंधश्रध्दा दूर होण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग करून दाखविले. 

          सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजी निवृत्ती साळुंके म्हणाले की, “प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही न काही समस्या असतात. व या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तो काहीतरी पर्याय शोधत असतो. अश्यावेळी अनेक बाबा लोक धर्माच्या नावावर लोकांना लुटण्यासाठी पुढे येतात.”

       सदर कार्यक्रमास मा. सौ. संगिता साळुंखे (माई), (सदस्य, केंद्रीय दिशा समिती), श्री प्रदीप काशीद (सरपंच), मा. श्री. कैलास साळुंखे (उपसरपंच), मा. श्री. प्रल्हाद जाधव, श्री. चंद्रकांत माने(माजी सरपंच) श्री. संतोष साळुंखे, श्री. जयवंत पवार, सौ. तेजस्विनी साळुंखे, सौ. कोमल  साळुंखे श्री तानाजी चव्हाण, संजय पवार, श्री विलास साळुंखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या सुरवातीला शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी एन.एस.एस. गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एन ए. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. संजना कदम हिने करून दिला. तर आभार कु. वैष्णवी पवार हिने मानले. सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा संजय जाधव हिने केले. या समारंभास मौजे किवळ येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, तसेच वेणूताई चव्हाण कॉलेजचे प्रा. डॉ. श्रीमती एस. एम. चव्हाण, प्रा. श्रीमती पी. आर. कदम  शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here