Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य एम एड व एम.ए.एज्युकेशन प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने ग्रामविकास...

महाराष्ट्र राज्य एम एड व एम.ए.एज्युकेशन प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना विविध मागण्या साठी निवेदन

251

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

▪️मागण्याविषयीं मंत्रालयात सचिव व संघटनेच्या पदाधिकारी यांच्या बैठकीचे आश्वासन

म्हसवड /सातारा(दि.3फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्य एम. एड. व एम. ए.एज्युकेशन प्राथमिक संघटना यांच्या वतीने राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये त्यांचे बोराटवाडी येथील निवासस्थानी भेट घेण्यात आली यावेळी संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देणेत आले.

यावेळी जयकुमार गोरे यांची राज्याच्या ग्रामविकास मंत्री पदी नियुक्ती झाल्याने संघटनेच्या वतीने पत्र व शाल देऊन अभिनंदन करण्यात आले.

सदर निवेदनात 

1)महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदा सेवा व सेवा प्रवेश अधिनियम 1967 मध्ये सुधारणा करण्यात यावी. 

 2)58 वर्षे सेवा शर्ती अधिनियमामध्ये बदल करण्यात आलेला नाही. आपणाकडून सदर क्रांतीकारक निर्णय घेण्यात यावा.

3) सदर सेवाशर्ती अधिनियमामध्ये बदल करताना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा जिल्हा तांत्रिक सेवेत समावेश करण्यात यावा.

    सदरचा समावेश केल्यास शालेय शिक्षण विभागातील विस्तारअधिकारी,गटशिक्षणाधिकारी,शिक्षणाधिकारी या रिक्त प्रशासकीय वर्ग एक व दोन पदांवर सेवा संधी उपलब्ध होऊ शकते.

      सदरची पदेही सरळ सेवा भरतीने प्राथमिक शिक्षकांमधूनच भरण्यात यावी.

4) सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण विभागात वर्ग एक व वर्ग दोन व तीन ची अनेक पदे रिक्त आहेत. सदर पदांवरती अभावितपणे काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.

5) सदर रिक्त पदांवर प्राथमिक शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहे.

6) सदर पदांवर काम करण्यासाठी आमच्याकडे गुणवत्ता आहे व अनुभव आहे.

      मंत्री जयकुमार गोरे यांनी सदरचे निवेदन मान. सचिव साहेब, ग्राम विकास विभाग यांच्याकडे तातडीने पुढील कार्यवाहीसाठी शिफारस व नोंद करून पाठवले आहे.या संदर्भात येत्या आठवड्याभरात मा.मंत्री महोदय व मा. सचिव साहेब यांच्या दालनात संघटनेची मिटिंग आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले.

सदर निवेदन देणेकरिता राज्याध्यक्ष प्रदिप शिंदे, राज्य सरचिटणीस ॲड. बिपीन साळवे, राज्य कोषाध्यक्ष भिमराव पाटील, राज्य महिला विभाग प्रमुख अंजली कट्टे, राज्य चिटणीस राजेश खैरनार, सुभाषराव अहिरे, भरत पाटील, विलास हडस, सातारा जिल्हाध्यक्ष राजाराम तोरणे, सातारा जिल्ह्यातून राजेंद्र खाडे, विनोद शिलवंत, चंद्रकांत जाधव, अनिता तोरणे, संजय ढेरे, प्रेमदास राठोड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here