Home महाराष्ट्र लोकमाता अहिल्यादेवी चा आदर्श, नित्य नव्या पिढीने घ्यावा ” प्राचार्य दिनानाथ फुलवाडकर

लोकमाता अहिल्यादेवी चा आदर्श, नित्य नव्या पिढीने घ्यावा ” प्राचार्य दिनानाथ फुलवाडकर

141

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.26जानेवारी):- आजच्या काळात, राजमाता अहिल्यादेवी ने केलेले कार्य, समाजातील सर्व घटकासाठी, प्रेरणादायी आहे. समाजकारण- राजकारण- आणि सांस्कृतिक समन्वय यांच्या उन्नतीसाठी अहिल्यादेवींनी सतत कार्य केले, राजमाता अहिल्यादेवी यांची जन्म त्रिशताब्दी सर्वत्र साजरी होत आहे, त्यानिमित्ताने संपूर्ण वर्षभर शैक्षणिक जनजागृती चे कार्य लायन्स क्लब च्या माध्यमातून करावयाचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य दिनानाथ फुलवाडकर सर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदन प्रसंगी केले.

 येथील संत जनाबाई विद्यालयात,- प्रजासत्ताक दिनानिमित्त लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन च्या वतीने, शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला, याप्रसंगी विविध राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला,

 विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त पाळावी, सर्व गोष्टी वेळेवर कराव्यात, नियमित अभ्यास करावा- म्हणजे आपले ध्येय गाठणे सहज शक्य होईल- असे मार्गदर्शन- समारोपप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर आहेरकर सर यांनी केले.

 विद्यालयाचे मुख्याध्यापक – शिवाजी केंद्रे, सर्व स्टाफ, संस्थेचे सचिव गंगाधर मुंडे, लॉयन्स क्लबचे पदाधिकारी – गोविंद निरस, प्राचार्य बालाजी ढाकणे, दगडूशेठ सोमानी, रामेश्वर तापडिया, बालाजी कांदे सर, राजेश पाठक, संभाजी वाडेवाले सर, माऊली शिंदे, महादेव गीते,केशव देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. एकूण शंभर विद्यार्थ्यांना वही आणि पेन देण्यात आल्या. राष्ट्रभक्तीपर गीताने सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here