Home Breaking News इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन

इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन

315

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.16जानेवारी):- भविष्यातील धोके लक्षात घेता प्रत्येक नागरिकांनी तसेच वाहन चालक तसेच यांत्रिकी विभागातील कर्मचारी यांच्यात इंधन बचत काळाची गरज ओळखून त्यांची जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी आज ब्रह्मपुरी आगारामध्ये इंधन बचत मासिक कार्यक्रम 2025 चे उद्घाटन चंदनकर साहेब पालक अभिकारी तथा विभागीय कर्मचारी वर्ग अभिकारी यांचे हस्ते दीप प्रज्वल करण्यात करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रशांत डांगे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते, आगार व्यवस्थापक इंगोले साहेब, प्रभाकर वासनिक साहेब, हे उपस्थित होते.मा आगार व्यवस्थापक इंगोले साहेब व प्रशांत डांगे, पत्रकार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वामन जी नागोसे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री गोपाल जी राकडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here